• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • Valentines Day 2020 : डेटिंगवर जाताय, 'या' गोष्टी टाळा नाहीतर घोळ होईल

Valentines Day 2020 : डेटिंगवर जाताय, 'या' गोष्टी टाळा नाहीतर घोळ होईल

चुकीच्या समजुती आणि सांस्कृतिक परिस्थिती यामुळे डेटिंग (Dating) नाजूक विषय बनला आहे आणि नॉन मेट्रो सिटीमध्ये तर खूपच गंभीर...

 • Share this:
  जवळपास 10 वर्षांपूर्वी 19 वर्षांच्या मुलाने आपल्या रक्ताने प्रेमपत्र लिहिलं आणि त्याला आवडत असलेल्या मुलीच्या हातात नेऊन दिलं. यावेळी त्या मुलीची काय अवस्था झाली असेल, याचा अंदाज तुम्हाला आलाच असेल. एका मुलाने आपल्याला त्याच्या रक्ताने प्रेमपत्र लिहिलं याचं तिला आश्चर्य तर वाटलंच, शिवाय तिच्या मनात भीतीनं घरही केलं. एका छोट्याशा गावात घडलेली ही घटना. जिथं डेटिंग ही संकल्पनाही माहिती नाही, तिथं कल्पनाही केली नसेल अशा पद्धतीने एखादा तरुण तरुणीला भेटतो, मग अंगावर काटा तर येणारच ना ! मात्र आधुनिकीकरण आणि तंत्रज्ञानातील प्रगती यामुळे गेल्या काही वर्षात देशातील नॉन-मेट्रो सिटी आणि छोट्या शहरांचा डेंटिगबाबतचा दृष्टिकोन बदलला आहे. तरुण आणि तरुणी बॉलीवूड स्टाईल प्रेमातून बाहेर पडत आहेत आणि डेटिंगसारख्या नव्या संकल्पनेकडे वळत आहेत. आपण एकदाच प्रेमात पडतो आणि आयुष्यात लग्न एकदाच होतो अशी विचारसरणी आता त्यांची नाही. डेटिंगचं धोकादायक जग डेटिंग म्हणजे नेमकं काय याबाबतच पुरेसं माहिती नसतं, त्यामुळे बहुतेक लोकांना डेटिंगमध्ये काय करावं आणि काय करू नये याची कल्पना नसते. डेटिंग म्हणजे जिथं दोन व्यक्ती एकमेकांना भेटतात, एकमेकांना समजून घेतात आणि आपण भावनिकरित्या एक होऊ शकतो का? आपलं घट्ट असं नातं जुळू शकतं का? हे ओळखण्याचा प्रयत्न करतात. चुकीच्या समजुती आणि सांस्कृतिक परिस्थिती यामुळे डेटिंग नाजूक विषय बनला आहे आणि नॉन मेट्रो सिटीमध्ये तर खूपच गंभीर... अशा छोट्या शहरात जिथं एकत्र कुटुंबं असतं आणि शेजारीही एकमेकांना चांगलं ओळखतात, तिथं महिलांवर सतत लक्ष ठेवलं जातं. तरुण-तरुणी एकमेकांसह डेटवर जातील अशा जागा जवळजवळ नसतात, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. लग्नाच्या नवऱ्याव्यतिरिक्त एका महिलेनं परपुरुषाकडे पाहूदेखील नये, अशी सामाजिक परिस्थिती असते. अशा छोट्या शहरांमध्ये कथित संस्कृतीरक्षक असतात जे, अशा पद्धतीचं पाऊल उचलण्याचा विचार करणाऱ्यांच्या मनात भीती निर्माण करतात. इतके सर्व अडथळे असले, तरी तरुण त्यांना जुमानत नाहीत. त्यांच्यावर लादण्यात आलेली ही सर्व बंधनं ते तोडण्यासाठी मागचापुढचा कोणताही विचार करत नाही. सध्या दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीत असलेल्या शहरांतील पुरुष आणि महिला एकमेकांना सोशल मीडिया आणि डेटिंग अॅपच्या माध्यमातून तर भेटतात, मात्र त्यांना डेटिंगबाबत पुरेशी माहिती नसल्याने डेटिंग त्यांना आव्हानात्मक वाटतं. मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेरमध्ये राहणारा विवेक (नाव बदललेलं). त्यानं आपला पहिल्या डेटिंगचा अनुभव सांगितला. टिंडरवर एका सुंदर मुलीसोबत त्याची ओळख झाली. महिनाभर त्यांचं बोलणं सुरू होतं, अखेर त्यानं तिला आपल्याला भेटण्यासाठी तयार केलं. आपल्याला कुणी आपल्या नातेवाईकांनी, शेजाऱ्यांनी किंवा ओळखीच्या व्यक्तीने पाहू नये, अशी मुलीची इच्छा होती. त्यामुळे घरापासून दूर असलेल्या एका कॅफेजवळ भेटायचं असं त्यांचं ठरलं. विवेकला भेटण्यासाठी ती मुलगी ऑटोतून आली, तिनं आपला चेहरा दुपट्ट्याने झाकून घेतला होता. दोघंही कॅफेतील एका कोपऱ्यात बसल्यानंतर तिनं आपल्या चेहऱ्यावरील दुपट्टा हटवला आणि ती लाजत हसली. विवेक तिला पाहून आनंदितही झाला आणि घाबरलाही. कारण डेटवर त्याला समजलं की ती मुलगी त्याच्या कॉलेजमधील एका गुंड्याची चुलत बहीण होती. त्याने घाईघाईत डेट आटोपली आणि त्यानंतर पुन्हा त्या मुलीला भेटलाही नाही. तो अजूनही टिंडर वापरतो. मात्र आता तो मॅच्युअर झाला आहे. काय चालतं आणि काय नाही हे त्याला समजलं आहे. डेटिंगबाबत कुतूहल मेरठमध्ये राहणाऱ्या रितूचं (नाव बदललेलं) लग्न ठरलं होतं. आईवडिलांनीच तिच्यासाठी मुलगा पसंत केला होता. मात्र लग्नाआधी रितूला डेटवर जायचं होतं. तिचा तिच्या मैत्रिणीचा भाऊ खूप आवडायचा. जेव्हा कधी ती मैत्रिणीच्या घरी जायची तेव्हा काही ना काही कारण काढून त्याला भेटायची. एकेदिवशी तिनं हिंमत केली आणि त्याला कॅफेमध्ये भेटण्याबाबत विचारलं. डेटिंगच्या उत्साहात रितूला रात्रभर झोप लागली नाही. मात्र डेटिंगबाबतचा तिचा हा उत्साह फार काळ कायम राहिला नाही. तिला जो मुलगा शांत आणि आत्मविश्वासी वाटला तो खरं तर उतावळा आणि डिसेपरेट होता. तिला घुसमटल्यासारखं वाटू लागलं आणि काही तरी कारण सांगून ती तिथून निघून गेली. त्यानंतर ती कधीच डेटवर गेली आणि आता तिनं लग्न केलं. काही गोष्टी लक्षात ठेवाल तर तुमचा डेटिंगचा अनुभव चांगला होईल. कूल राहा बहुतेक डेट फेल होण्याचं प्रमुख कारण म्हणजे उतावळेपणा. यामुळे महिला आणि पुरुष दोघांच्या उत्साहावर पाणी फेरतं. डेटिंगचा पहिला नियम म्हणजे कूल राहा. उतावळेपणा नाही तर रसिकता दाखवा. योग्यप्रकारे भेटा छोट्या शहारामध्ये मुलीला थेट जाऊन भेटणं शक्य नाही आणि कॉलेजच्या बसमध्ये प्रेमपत्र फेकणंही फायद्याचं नाही. निधीला (नाव बदललेलं) तिच्या वर्गातील एका मुलाने प्रेमपत्र दिलं. निधी ते पत्र वाचण्याआधी बसमध्ये असलेल्या सर्वांनी ते पत्र वाचलं. त्यानंतर कित्येक दिवस निधीला कोणत्या परिस्थितीचा सामना करावा लागला असेल, आपण कल्पना करूच शकतो. त्यामुळे तुम्हाला एखादी व्यक्ती आवडत असल्यास आणि तिला भेटायचं असल्यास तिच्याशी ओळख करून देण्यासाठी मित्रमंडळींची मदत घ्या. मर्यादा पाळा सोशल मीडिया आणि डेटिंग अॅप वापरताना जबाबदारीने वागा. एखादी व्यक्ती तुमच्या मेसेजला प्रतिसाद देत नाही, याचा अर्थ तिला तुमच्यात काही रस नाही. तिचा विचार सोडून द्या, तिला त्रास देऊ नका. बातम्या वाचा तुमच्या आजूबाजूला काय घडतं आहे, याबाबत जागरूक राहा. ज्या भागात कथित संस्कृतीरक्षकांच्या टोळ्या असतील, विशेषत वॅलेंटाईन डेला असे कथित संस्कृतीरक्षक जास्त लक्ष ठेवून असतात, अशा ठिकाणी जाणं टाळा. हळूहळू पुढे जा डेटिंग अॅप हे महिला फक्त पती शोधण्यासाठी वापरतात, असं पुरुषांना वाटतं. तर पुरुष फक्त टाइमपाससाठी वापरतात असं महिलांना वाटतं. तुमचा हेतू काय आहे तो स्पष्ट असूद्या. मात्र पुढच्या टप्प्यावर जाण्याआधी एकमेकांना समजून घेण्यासाठी वेळ द्या. शिष्टाचार बाळगा पायल (नाव बदललेलं) ज्या मुलासोबत डेटवर गेली होती, त्या मुलाचं लक्ष किती तरे वेळा तिच्या ब्रेस्टकडे गेलं होतं. तसंच त्या मुलाच्या शरीराला दुर्गंधही येत होता. त्यामुळे पायल डेट सोडून निघून गेली. अशा छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवा. सौम्य असा डिओडरंट किंवा परफ्युम वापरा. डोळ्यात डोळे घालून बोला. बोलताना चुकूनही नाकात बोटं घालू नका. डेटिंगसाठी या काही प्रमुख टिप्स आहेत. यापुढे जेव्हा तुम्ही डेटिंगवर जाल तेव्हा या टिप्स फॉलो करा आणि तुमच्यासाठी किती फायद्याच्या ठरतात ते पाहा. Play cool and be safe. लेखिका – रजनी, Redwomb  संकेतस्थळावर columnist आहेत. Redwomb हे सेक्सबाबत लोकांना माहिती देणारं ऑनलाईन व्यासपीठ आहे.
  Published by:Priya Lad
  First published: