मुंबई, 14 मे : बॉलिवूडचे स्टारकिड्स नेहमीच चर्चेत असतात. इंडस्ट्रीत आज अनेक स्टार किड्स आहेत, ज्यांनी आपल्या अभिनयाच्या बळावर इंडस्ट्रीत नाव कमावलं आहे. आलिया भट्टपासून सारा अली खान, वरुण धवनपर्यंत असे अनेक स्टारकिड्स आहेत जे आज इंडस्ट्रीवर राज्य करत आहेत. पण त्याचबरोबर असे अनेक स्टार किड्स आहेत जे काळाच्या ओघात फिल्मी दुनियेतून गायब झाले. आज आम्ही तुम्हाला अशाच एका स्टार किडबद्दल सांगणार आहोत, ज्याचे वडील त्यांच्या काळातील सुपरस्टार होते. त्यावेळी त्यांना ज्युबली स्टार म्हटले जात असे. पण त्यांच्या मुलगा मात्र सुपरफ्लॉप ठरला. हे सुप्रसिद्ध अभिनेते म्हणजे राजेंद्र कुमार आणि त्यांचा मुलगा म्हणजे अभिनेता कुमार गौरव. जेव्हा कुमार गौरवने इंडस्ट्रीत पाऊल ठेवले आणि त्याचा पहिला चित्रपट सुपर डुपर हिट ठरला. कुमार गौरवच्या चित्रपटाचे कलेक्शन पाहून तोही वडील राजेंद्र कुमार यांच्यासारखाच मोठा स्टार होईल, असा अंदाज सगळ्यांनीच बांधला होता. पण त्याच्या नशिबात काहीतरी दुसरेच लिहिले होते.
कुमार गौरवने 1981 मध्ये ‘लव्ह स्टोरी’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात त्यांच्यासोबत विजया पंडित दिसली होती. हा चित्रपट देखील विजेतेचा पहिला चित्रपट होता, जो सुपरहिट ठरला होता. पण, यानंतर कुमार गौरवचे ऑल राउंडर, जनम, रोमान्स लव्हर्स आणि नाम हे चित्रपट काही खास कामगिरी करू शकले नाहीत. त्यामुळे हळूहळू कुमार गौरव चित्रपटांमधून गायब होऊ लागला. राज कपूरच्या मुलीसोबत लग्नाला नकार देताच रातोरात संपलं ‘या’ अभिनेत्याचं करिअर; आता करतो हे काम कुमार गौरवचे वडील म्हणजेच राजेंद्र कुमार यांना त्याने अभिनयविश्वात पदार्पण करावं असं वाटत नव्हतं. परदेशातून शिक्षण पूर्ण करून मायदेशी परतलेल्या कुमार गौरवने जेव्हा त्याच्या सुपरस्टार वडिलांना सांगितले की, त्याला हिरो बनायचे आहे, तेव्हा राजेंद्र कुमारने त्याच्यासमोर एक अट ठेवली. राजेंद्र कुमार म्हणाले की, ‘आधी तुला स्क्रीन टेस्ट द्यावी लागेल, जर तू ती उत्तीर्ण झालास तर मी स्वतः तुझ्यासाठी चित्रपट तयार करेन आणि नाही तर तुला मी सांगेन ते करावे लागेल.’ मुलाने अट मान्य केली आणि स्क्रीन टेस्ट दिली. पण कुमार गौरव स्क्रीन टेस्टमध्ये नापास झाला. आपल्या मुलाची स्क्रीन टेस्ट पाहून राजेंद्र कुमार म्हणाले, ‘तू हिरो बनू शकत नाहीस’. पण स्क्रीन टेस्टमध्ये नापास झाल्यानंतर कुमार गौरव राज कपूर यांच्यासोबत राहू लागला. त्याने राज कपूर यांच्या ‘सत्यम शिवम सुंदरम’ चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. पण, अभिनेता होण्याचा किडा त्याच्या मनातून गेला नाही. त्यानंतर त्याने वडिलांना ‘मला अभिनेताच व्हायचं आहे’ असं सांगून टाकलं.
मुलाच्या जिद्दीपुढे राजेंद्र कुमार यांनी हार मानली. पण पुन्हा तीच स्क्रीन टेस्टची अट मुलासमोर ठेवली. यावेळी कुमार गौरवची स्क्रीन टेस्ट आरके स्टुडिओमध्ये झाली, जिथे राज कपूरला समोर पाहून कुमार थोडा घाबरला. अभिनय तर दूरच, त्याला धड बोलताही येत नव्हते. राजेंद्रही तिथे उपस्थित होता, त्याला आपल्या मुलाला पाहून राग आला. तो म्हणाला, ‘राज कपूरसारख्या अभिनेत्यासोबत काम करूनही तू मागे राहिलास. तू अभिनेता होण्यासाठी योग्य नाहीस.’ पण, राज कपूरच्या सांगण्यावरून राजेंद्र यांनी त्यांचा मुलगा कुमार गौरव याला रोशन तनेजा यांच्या अॅक्टिंग स्कूलमध्ये पाठवले. कुमार 6 महिने अभिनय शिकून परतला, राजेंद्रने त्याच्यासाठी एक चित्रपट साइन केला होता. हा चित्रपट लव्हस्टोरी होता, जो त्यावेळी खूप हिट ठरला होता. पण, त्यानंतर त्यांचा एकही चित्रपट चालला नाही. जेव्हा सर्वांनी कुमार गौरवला त्यांच्या चित्रपटात घेण्यास नकार दिला तेव्हा राजेंद्र कुमार यांनी त्यांचा बंगला गहाण ठेवला आणि त्यांच्या मुलासाठी चित्रपट बनवला. पण, हा चित्रपटही चालू शकला नाही. कुमार शेवटचा 2009 मध्ये एका चित्रपटात दिसला, त्यानंतर तो चित्रपट सोडून व्यवसायाकडे वळला आणि सोशल मीडियापासून दूर राहिला.