जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / राज कपूरच्या मुलीसोबत लग्नाला नकार देताच रातोरात संपलं 'या' अभिनेत्याचं करिअर; आता करतो हे काम

राज कपूरच्या मुलीसोबत लग्नाला नकार देताच रातोरात संपलं 'या' अभिनेत्याचं करिअर; आता करतो हे काम

राज कपूर- कुमार गौरव

राज कपूर- कुमार गौरव

बॉलिवूडचा एक स्टार अभिनेता दिग्गज अभिनेते राज कपूर यांचा जावई होणार होता. कपूर कुटुंबाशी त्याचं नातं पक्क झालं होतं. पण ते नातं तुटलं आणि हा स्टार रातोरात इंडस्ट्रीतून गायब झाला. नक्की काय घडलं त्याच्यासोबत जाणून घ्या.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 02 मे : बॉलिवूडमध्ये एक असा हिरो होता ज्याला मुली पाहायच्या तेव्हा अक्षरशः वेड्या व्हायच्या. त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळाच निरागस भाव होता. प्रेक्षक पुन्हा पुन्हा त्याचे चित्रपट थिएटरमध्ये पाहायला जायचे. त्याच्या चेहऱ्यानेच नाही तर त्याच्या दमदार अभिनयानं देखील प्रेक्षकांची मने जिंकली होती. त्यांनी बॉलिवूडमध्ये एका पाठोपाठ हिट चित्रपट देत नाव कमावलं. अशातच हा स्टार बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते राज कपूर यांचा जावई होणार होता. कपूर कुटुंबाशी त्याचं नातं पक्क झालं होतं. पण ते नातं तुटलं आणि हा स्टार रातोरात इंडस्ट्रीतून गायब झाला. नक्की काय घडलं त्याच्यासोबत जाणून घ्या. ‘ज्युबली कुमार’ या नावाने बॉलिवूडमध्ये ओळख निर्माण करणारे राजेंद्र कुमार यांनी एकापाठोपाठ एक हिट चित्रपट दिले. त्यांचा मुलगा कुमार गौरव. हा स्टारकिड जितक्या वेगाने हिट झाला, तितक्याच वेगाने फ्लॉप झाला. कुमार गौरवने आपल्या पहिल्याच चित्रपटाने बॉलिवूडमध्ये नाव कमावलं होतं. त्याच खरं नाव मनोज तुली असं होतं. बॉलीवूडमध्ये आधीच एक मनोज असल्याने त्याचे नाव कुमार गौरव असे ठेवण्यात आले.

News18लोकमत
News18लोकमत

कुमार गौरव त्या काळात खूपच हँडसम दिसायचा.   ‘लव्ह स्टोरी’ या पहिल्याच चित्रपटापासून ते इतके प्रसिद्ध झाले की लोकांना वाटू लागले की राजेंद्र कुमारप्रमाणे त्यांचा मुलगाही नाव कमवेल. पहिल्या चित्रपटानंतर निर्मात्यांनी त्याला चित्रपटात घेण्यासाठी रांगा लावल्याचं म्हटलं जातं. पहिल्या चित्रपटात त्याची जोडी विजया पंडितसोबत होती. दोघांची केमिस्ट्री चित्रपटात तर चांगली जमलीच होती पण  त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही रंगत आली होती. हेमा मालिनीनं लग्नाच्या 43 व्या वाढदिवशी शेअर केली रोमँटिक पोस्ट; सेलिब्रेशनचे खास फोटो आले समोर विजया दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले, परंतु चित्रपटाप्रमाणे त्यांची लव्हस्टोरी यशस्वी होऊ शकली नाही. याचे कारण म्हणजे राज कपूर यांची राजेंद्र कुमार यांच्याशी असलेली घट्ट मैत्री. खरे तर राज कपूर आणि राजेंद्र कुमार खूप चांगले मित्र होते. राज कपूर यांना त्यांची मुलगी रीमा कपूर हिचे लग्न कुमार गौरवसोबत करायचे होते. इकडे राजेंद्र कुमार यांनाही त्यांच्या मैत्रीचे रुपांतर नात्यात करायचे होते. कुमार गौरवचा रीमा कपूरशी साखरपुडा झाला. पण विजया पंडितच्या प्रेमात वेडे झालेल्या कुमार गौरवने रीमासोबत लग्नाला नकार दिला. कुमार गौरवने लग्नाला नकार दिल्यानंतर दोन्ही कुटुंबांनी हे लग्न न लावण्याचा निर्णय घेतला. जेव्हा एंगेजमेंट तुटली तेव्हा राज कपूर खूप रागावले होते. त्यानंतर राजेंद्र कुमार संतापला आणि त्यांनी कुमार गौरव आणि विजया पंडित यांच्या नात्याला नकार दिला.

News18

वैयक्तिक आयुष्यातील वादळाची झळ कुमारच्या करिअरलाही पोहचली. त्याचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप होऊ लागले. त्याला पुन्हा कधीच पाहिल्यासारखं यश मिळालं नाही. कुमारच्या पहिल्याच चित्रपटाचे यश तो नीट पचवू शकला नाही, असे म्हटले जाते.  यामागे दोन कारणे होती. एक तर तो स्वत:ला स्टार समजू लागला आणि दुसरे म्हणजे तो नवीन स्टार्सला स्ट्रगलर्स मानू लागला. याचमुळे त्याच्या हातून काही चांगले चित्रपट निसटले. 1986 मध्ये वडील राजेंद्र कुमार यांनी आपल्या मुलाच्या करिअरला पाठबळ देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी ‘नाम’ या चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटात संजय दत्त, नूतन आणि अमृता सिंग यांच्याही भूमिका होत्या. हा चित्रपट सुपरहिट ठरला. मात्र या चित्रपटाच्या यशाचे सर्व श्रेय संजय दत्तला मिळाले आणि कुमार गौरव केवळ सहायक अभिनेता म्हणून राहिला. कुमार गौरव हळू हळू दिसेनासा होत गेला. 2002 मध्ये आलेला ‘कांते’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता. यानंतर तो हळूहळू बॉलिवूडपासून दूर गेला. त्याचा विवाह संजय दत्तची बहीण नम्रता दत्त हिच्याशी झाला आहे. आज कुमार गौरव एक यशस्वी व्यापारी आहे, कुमार गौरवचा मालदीवमध्ये ट्रॅव्हलचा व्यवसाय आहे आणि तो बांधकाम व्यवसायातही आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात