शिल्पा शेट्टीनं लगावली नवऱ्याच्या कानशिलात; म्हणाली, ‘लायकीत राहा...’

शिल्पा शेट्टीनं लगावली नवऱ्याच्या कानशिलात; म्हणाली, ‘लायकीत राहा...’

शिल्पा नवऱ्याच्या कानाखाली मारत असल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • Share this:

मुंबई, 18 मार्च : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी तिचा फिटनेस आणि लुकमुळे नेहमीच चर्चेत असते. तर दुसरीकडे तिचा नवरा राज कुंद्रा मात्र लाइम लाइटपासून शक्यतो दूर राहणंच पसंत करतो. शिल्पा सिनेमात काम करत असतानाही राजनं कधीच सिनेसृष्टीत येण्याची इच्छा व्यक्त केली नाही मात्र पत्नी शिल्पाप्रमाणेच राज सुद्धा सोशल मीडियावर खूप सक्रिय असलेला दिसून येतो. पण आता काही असं घडलं आहे ज्यामुळे राज चर्चेत आला आहे आणि याचं कारण स्वतः शिल्पा शेट्टी आहे. शिल्पा नवऱ्याच्या कानाखाली मारत असल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

राज कुंद्रा सिनेमात काम करत नसला तरीही सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांची संख्या सुद्धा कमी नाही. लोकप्रिय असलेल्या टिकटॉकवर राज कुंद्रानं नुकताच 1 मिलियन फॉलोअर्सचा टप्पा गाठला. त्यामुळे अनेकांना आश्चर्य वाटत आहे. पण राज मात्र खूप खूश असून त्यानं टिकटॉकवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.

VIDEO: हात धुताय ना? सचिन तेंडुलकरनंतर दीपिकाने घेतलं सेफ हॅण्ड्स चॅलेंज

शोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये राज कुंद्रा 'न हम अमिताभ, न दिलीप कुमार, न किसी हीरो के बच्चे' या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. पण एवढ्यात शिल्पा त्या ठिकाणी येते आणि राजच्याच्या कानाखाली वाजवते आणि सांगते, ‘लायकीत राहा, तू माझा नवरा आहेस.’ राज कुंद्रानं हा व्हिडीओ शेअर करताना लिहिलं, मला एवढं प्रे दिल्याबद्दल सर्वांचे आभार. टिकटॉकवर 3 महिन्यात 1 मिलियन फॉलोअर्स हा कशी मस्करी आहे शिल्पा.

OMG! अल्बम रिलीजआधीच प्रसिद्ध गायिका लेडी गागानं केलं न्यूड फोटोशूट

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा 15 फेब्रिवारी 2020 ला दुसऱ्यांदा आई-बाबा झाले. 21 फेब्रुवारीला त्यांनी सर्वांना ही गुड न्यूज दिली.शिल्पानं मुलीचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत मुलीचं नाव समिशा ठेवल्याचं सांगितलं होतं. याआधी शिल्पाला विहान नावाचा मुलगा आहे. मुलीच्या जन्मासाठी शिल्पानं सरोगसीची मदत घेतली होती.

बिग बींची 'कोरोना-फिरोना' मराठीत, सुनिल बर्वेच्या आवाजातली ही कविता ऐकलीत का?

First published: March 18, 2020, 9:37 AM IST

ताज्या बातम्या