• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • Raj Kundra arrest Live Updates: राज कुंद्राविरोधात जवाब दिलेल्या अभिनेत्रीला जिवे मारण्याची धमकी; न्युड ऑडिशनचा केला होता आरोप

Raj Kundra arrest Live Updates: राज कुंद्राविरोधात जवाब दिलेल्या अभिनेत्रीला जिवे मारण्याची धमकी; न्युड ऑडिशनचा केला होता आरोप

अभिनेत्री आणि मॉडेल सागरिका सुमनने (Sagrika Suman) राजवर न्युड ऑडीशनचा (Nude Audition) आरोप केला होता. तर आता तिला जिवे मारण्याच्या आणि बलात्काराच्या धमक्या येत आहेत.

 • Share this:
  मुंबई 23 जुलै: उद्योगपती राज कुंद्राला (Raj Kundra) पोलिसांनी अटक केल्यानंतर हळू हळू अनेक गोष्टी आता बाहेर येत आहेत. दरम्यान हे प्रकरण फेब्रुवारी महिण्यापासून सुरू आहे. पण राजने लाच देऊन स्वतःला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला होता असही समोर आलं होतं. तर फ्रेब्रुवारी महिण्यातच एका अभिनेत्रीने राजवर आरोप केले होते. त्या अभिनेत्रीला जिवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याचं तिने म्हटलं आहे. अभिनेत्री आणि मॉडेल सागरिका सुमनने (Sagrika Suman) राजवर न्युड ऑडीशनचा (Nude Audition) आरोप केला होता. तर या संदर्भात तिने म्हटलं आहे, “मी खूप चिंतेत आहे की मला अनेक ऑनलाइन प्लेटफॉर्ममधून कॉल येत आहेत. ते मला धमकी देत आहेत. मला जीवे मारण्याची आणि बलात्काराच्याही धमक्या मिळत आहेत. लोक मला विविध नंबर्सवरून कॉल करत आहेत आणि सांगत आहेत की, राज कुंद्राने काय चुकीचं केलं.”

  मीरा कपूरचा आणखी एक व्हीडिओ Viral; योगा करताना स्वत:चीच केली पोलखोल

  सागरिका पुढे म्हणाली की, “ते मला धमकी देत हेत आणि माझ्यावर राज कुंद्राचा बिजनेस बंद करण्याचा आरोप लावत आहेत.” ती असंही म्हणाली की, “या लोकांमुळे तिच्या जीवाला धोका असल्याचं वाटत आहे. यांच्याविरोधात ती पोलिसांतही तक्रार दाखल करणार आहे.” दरम्यान सागरिकाने राजवर आरोप लावला होता की, राज कुंद्रा (Raj Kundra) पोर्नोग्राफी रॅकेटचा (Pornography racket) सहभागी आहे आणि त्याला लवकरात लवकर अटक व्हावी. तिने म्हटलं होतं, “मी एक मॉडेल आहे आणि मी मागील तिन ते चार वर्षे या इंडस्ट्रीत काम करत आहे. ऑगस्ट 2020 मध्ये मला उमेश कामतचा फोन आला त्यांनी मला एक बेव सीरिज ऑफर केली जीची राज कुंद्रा निर्मिती करणार होते.”

  रशियन सर्व्हर आणि पाकिस्तानी कनेक्शन; राज कुंद्रा पॉर्न रॅकेट प्रकरणात आतापर्यंतचा सर्वात मोठा खुलासा

  पुढे सागरिका म्हणाली की, “मला व्हिडीओ कॉलवर न्युड ऑडीशनची ऑफर दिली होती. हे तीन लोक होते, यातील एक उमेश कामत होते. एकाचा चेहरा दिसत नव्हता बहूतेक तो राज कुंद्रा होता. कारण उमेश कामत सतत राज कुंद्राचं नाव घेत होता तर ज्या पण साईट्स आहेत त्याचा राज कुंद्रा मालक आहे असही त्याने म्हटलं होतं.” दरम्यान मुंबई क्राइम ब्रँचने आतापर्यत 11 लोकांना अटक केली आहे. तर राज कुंद्राची अजूनही चौकशी सुरू आहे. हे जाळ मुंबई ते लंडन आहे असंही समोर आलं आहे.
  Published by:News Digital
  First published: