• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • रशियन सर्व्हर आणि पाकिस्तानी कनेक्शन; राज कुंद्रा पॉर्न रॅकेट प्रकरणात आतापर्यंतचा सर्वात मोठा खुलासा

रशियन सर्व्हर आणि पाकिस्तानी कनेक्शन; राज कुंद्रा पॉर्न रॅकेट प्रकरणात आतापर्यंतचा सर्वात मोठा खुलासा

पुन्हा एकदा व्हॉट्सअॅप चॅट समोर आलं असून यातून भारतातील गरजू, बेरोजगार मॉडेल्स, अभिनेत्रींच्या अश्लील व्हिडीओचा व्यवसाय सुरू असल्याचं उघड होत आहे.

 • Share this:
  मुंबई, 22 जुलै : पॉर्नोग्राफी प्रकरणात सूत्रधार असल्याचा आरोप असलेला राज कुंद्रा (Raj Kundra porn racket ) याच्या चार्टशीटमधील आणखी एक व्हॉट्सअॅप चॅट समोर आलं आहे. या व्हॉट्सअॅप चॅटमध्ये राज कुंद्राच्या वतीने एक व्यक्ती उज्ज्वल नावाच्या व्यक्तीसोबत संवाद साधत असल्याचं दिसत आहे. या व्हॉट्सअॅप चॅटमध्ये ते पॉर्नाग्राफीक कंन्टेंट काढण्याबद्दल बोलताना दिसत आहे. 17 ऑक्टोबर, 18 ऑक्टोबरदरम्यानचे हे व्हॉट्सअॅप चॅट आहेत. राज कुंद्रा पॉर्न क्लिप प्रकरणात एक नवीन व्हॉट्सअॅप चॅट समोर आला आहे. या चॅटमुळे संपूर्ण रॅकेटला कलाटणी दिली आहे. भारतातील गरजू, बेरोजगार मॉडेल्स, अभिनेत्रींचे अश्लील व्हिडीओ एका पाकिस्तानी नागरिकाचा हक्क असलेल्या वेबसाइटवर अपलोड करण्यात येत आहे. हा पॉर्न क्लिप अपलोड करण्यासाठी रशियन सर्व्हरचा उपयोग करण्यात आला आहे. (Shocking turn to Raj Kundra porn racket Big revelation from another WhatsApp chat) हे ही वाचा-मोठी बातमी: अटक टाळण्यासाठी राज कुंद्रानं पोलिसांना दिली 25 लाखांची लाच? या चॅटमधून समोर येतं की, पीडितेकडून पोलिसांत तक्रार करण्याची धमकी दिल्यानंतर कुंद्राच्या टीमने त्या पीडितेचा पॉर्न व्हिडीओ डिलिट केला. आरोपींनी अटकेची भीती होतीच. या चॅटमध्ये राज कुंद्राच्या वतीने एक व्यक्ती उज्ज्वल पारेख नावाच्या एका व्यक्तीशी संवाद साधत आहे. या व्हॉट्सअॅप चॅटमधून अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. पीडितांच्या कुटुंबाकडून दबाव आणल्यानंतरच ही टीम अश्लील व्हिडीओ डिलिट करण्यासाठी प्रयत्न करते. मात्र दुसऱ्या एका प्रकरणात तर पॉर्न व्हिडीओ पाकिस्तानी नागरिकाचा हक्क असलेल्या वेबसाइटवर अपलोड करण्यात आले होते. जेथून व्हिडीओ डिलिट करणं अशक्य आहे. व्हॉट्सअॅप चॅटचा (WhatsApp chat) मराठी अनुवाद 17 ऑक्टोबर उज्ज्वल : आपल्या ऑफिसचं काय अपडेट आहे? HS : मला मेसेज करण्यासाठी धन्यवाद, मात्र मी सध्या बिझी आहे, लवकरच संपर्क साधतो. 18 ऑक्टोबर उज्ज्वल - हाय सर HS - मी गोव्यावरुन मुंबईला येत आहे. ऑफिसबद्दल चिंता करू नका. राज सरांनी सांगितलं की, तुम्ही घरून काम करू शकता. केवळ सिनियर लोकांना ऑफिसला यावं लागेल. बाकी तू आणि जॉर्ज घरून काम करू शकता. HS - अरे ही लिंक लवकरात लवकर काढून टाक उज्ज्वल - येस सर HS - आर्टिस्टचे कुटुंबीय मला सातत्याने फोन करून पोलिसात जाण्याची धमकी देत आहेत. उज्ज्वल - हो सर, मी लवकरात लवकर काढण्याचा प्रयत्न करीत आहे. HS- भाऊ, प्लीज़ हेल्प आणि काढल्यानंतर सांगशील. उज्ज्वल - ओके HS- याशिलाय जे मेल केलं आहे तेदेखील प्राथमिकतेवर घे उज्ज्वल - काढून टाकलं HS-सर्व इमेज काढले.. उज्ज्वल - हो हे ही वाचा-डर्टी पिक्चरसाठी राजकडे होता प्लॅन बी, Hotshot बॅननंतर सिक्रेट अ‍ॅप होतं तयार 19 नोव्हेंबरचं चॅट HS - प्लीज हे देखील काढून टाक उज्ज्वल - हे काढणं खूप कठीण आहे. HS- का? ते लोक खूप तक्रार करीत आहेत. पूर्ण कुटुंब सायको आहे. उज्ज्वल - ही साइट रशियन सर्वरशी होस्टेड आहे. त्यामुळे अवघड आहे. HS- F### प्लीज काही तरी करं, हे लोक खूप त्रास देतायेत. उज्ज्वल - सर काही तरी करतो मी. उज्ज्वल - (एक मेसेज पाठवतो ) या साइटचे मालक रावळपिंजी पाकिस्तानमधील आहेत, आणि आता तर ते अधिक अवघड आहे. २३ नोव्हेंबर चॅट उज्ज्वल - या व्हिडीओचे रिव्ह्यू कॉपीराइटमध्ये नाहीत, त्यामुळे काढण्याची शक्यता खूप कमी आहे.
  Published by:Meenal Gangurde
  First published: