बाबो ! ऑर्डर केलेल्या दोन केळ्यांचं एवढं बिल; हॉटेल जोमात अभिनेता कोमात

बाबो ! ऑर्डर केलेल्या दोन केळ्यांचं एवढं बिल; हॉटेल जोमात अभिनेता कोमात

अभिनेता राहुल बोससोबत एका 5 स्टार हॉटेलमध्ये अजब प्रकार घडला आहे.

  • Share this:

मुंबई, 24 जुलै : लक्झरी हॉटेलमधील मोठ-मोठी बिलं आपण पाहतो. मात्र अभिनेता राहुल बोससोबत मात्र एक अजब प्रकार घडला आहे. त्याच्यासोबत जे घडलं ते ऐकून सर्वांनाच धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. राहुलनं एका 5 स्टार हॉटेलमध्ये 2 केळी खाल्ली आणि त्याचं जे बिल आलं ते पाहून राहुल चक्रावला. या हॉटेलनं 2 केळ्यांची 442 रुपये एवढी किंमत राहुल कडून वसूल केली. सध्या राहुल एका सिनेमाच्या शूटिंगसाठी चंदिगढमध्ये आहे. तिथल्या JW Mariott मध्ये तो थांबला असून त्यानं त्याच्या ट्विटरवर त्याचा हा अनुभव सर्वांशी शेअर केला आहे.

झाला ना पोपट! मित्राला KISS करायला गेली प्रिया प्रकाश, आणि...

राहुलनं त्याच्या अनुभवाविषयी लिहिलं, यावर विश्वास ठेवण्यासाठी तुम्हाला हे पाहावं लागेल. कोण म्हणतं फळ तुमच्या आरोग्यासाठी नुकसानकारक नाही. JW Mariott हॉटेलवाल्यांना विचारा. व्हिडिओमध्ये राहुलनं सांगितलं की, तो हॉटेलच्या जिममध्ये वर्कआउट करत होता. त्यावेळी त्यानं 2 केळी ऑर्डर केली. त्यानंतर त्याला जे बिल आलं ते पाहून त्याला आश्चर्याचा धक्का बसला.

Manoj Kumar यांनी असं काय केलं ज्यामुळे त्यांचं नावच बदललं गेलं

राहुलचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. अनेकांनी या लक्झरी हॉटेल्सच्या अवाजवी किमतींवर प्रश्न केला आहे. एका युजरनं लिहिलं, मला माहित नव्हतं की, सेलिब्रिटी टॅग या किंमतीसोबत येतो. तर दुसऱ्या युजरनं लिहिलं, जर तुम्ही बनाना शेक मागवला असता तर त्याची किंमत आयफोनच्या बरोबर असेल.

तर आणखी एका युजरनं यावर लिहिलं, प्रश्न हा आहे की यांनी ही केळी ऑस्ट्रेलियातून इन्पोर्ट केले होते का? तर, बरं झालं तुम्ही व्हिडिओ शेअर केला. कमीत कमी आम्हाला समजलं तरी भविष्यात आम्हाला कुठे जायचं आहे आणि कुठे नाही.

सुदैवानं मोठ्या दुर्घटनेतून वाचला दीपिका पदुकोणचा 'हा' हिरो

============================================================

VIDEO: आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर पुन्हा बरसला, सखल भागांत साचलं पाणी

First published: July 24, 2019, 1:39 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading