मुंबई, 24 जुलै : दिल्लीच्या जुन्या राजेंद्र नगरमधील एक विद्यार्थी. सुरुवातील पाकिस्तानमधून आलेल्या लोकांसाठी असेलेल्या रेफ्यूजी कॅम्पमध्ये राहत असे. नाव होतं हरिकृष्ण गिरी गोस्वामी. दिलीप कुमार यांचा मोठा चाहता. एक दिवस आपल्य मित्रांसोबत सिनेमा पाहयला गेला. सिनेमाचं नाव होतं ‘शबनम’. यामध्ये दिलीप कुमार यांच्या भूमिकेचं नाव होतं मनोज कुमार (Manoj Kumar). बस्स! यानंतर या मुलानं आपलं नाव हरिकृष्ण गिरी गोस्वामी बदलून मनोज कुमार केलं. जो पुढे जाऊन बॉलिवूडमध्ये लोकप्रिय अभिनेता बनला. पण त्यांचं हे नावही त्याच्या चाहत्यांनी बदलून टाकलं आणि त्याला मनोज कुमार स्वतःच कारणीभूत होते. अभिनेता मनोज कुमार यांचा आज 82 वा वाढदिवस. त्यानिमित्त जाणून घेऊयात त्यांच्या आयुष्यातील काही रंजक गोष्टी… मनोज कुमार यांचा जन्म पाकिस्तानातल्या अबोटाबादमध्ये झाला. इथेच लादेन लपून बसला होता आणि अमेरिकेने हल्ला करून त्याला ठार केलं. फाळणीनंतर ते दिल्लीला आले. पुढे दिल्लीच्या हिंदू कॉलेजमधून पदवी पर्यंतचं शिक्षण झाल्यानंतर मनोज कुमार मुंबईला आले. दिल्लीतून आलेला हा अभिनेता बॉलिवूडमध्ये हिट झाला मात्र त्याच्या चाहत्यांनी त्यांचं नाव मनोज कुमार बदलून भारत कुमार असं केलं. कारण ते एका मागोमाग एक हिट सिनेमा देत होते आणि प्रत्येक सिनमात असायचा देशभक्तीचा तडका आणि मनोज कुमार यांच्याकडून केल्या जाणाऱ्या भूमिकेचं नाव असायचं भारत कुमार.
Bigg Boss Marathi : कॅप्टन शिवानीनं वीणा आणि हीनाला दिली अडगळीच्या खोलीची शिक्षा
या देश भक्तीच्या सिनेमाची सुरुवात 1965 मध्ये आलेल्या ‘शहिद’ पासून झाली. या सिनेमात त्यांनी भगत सिंग यांची भूमिका केली होती आणि याचं विशेष असं होतं की आपली भूमिका समजून घेण्यासाठी मनोज कुमार भगत सिंगच्या आई विद्यावती कौर यांना भेटायला गेले. शहीद रिलीज झाला आणि सुपरहिट सुद्धा झाला. त्यानंतर मनोज कुमार यांनी ‘उपकार’, ‘पुरब और पश्चिम’, ‘रोटी कपडा और मकान’, ‘क्रांती’ असे अनेक ब्लॉकबास्टर सिनेमा आले. या सर्वात एक गोष्ट समान होती. ती म्हणजे देशप्रेम.
अलिया-रणबीरच्या लग्नाचा मुहूर्त नाही पण लेहंगा ठरला!
मनोज कुमार आणखी एका गोष्टीसाठी प्रसिद्ध होते. ते म्हणजे एक हात चेहऱ्यावर ठेऊन डायलॉग बोलणं. त्यांची हीच स्टाइल पुढे त्यांची सिग्नेचर स्टाइल बनली होती. त्यांची ही स्टाइल बॉलिवूडच्या आणखी दोन मोठ्या अभिनेत्यांनीही कॉपी केली आणि या दोघांसोबतही मनोज कुमार यांचं खूप गमतीशीर नातं राहीलं आहे. पहिला सुपरस्टार शाहरुख खान ज्यानं मनोज कुमार यांची सिग्नेचर स्टाइल ‘ओम शांति ओम’मध्ये कॉपी केली होती. तर दुसरा अभिनेता होता रणवीर सिंह.
रणवीरच्या आज्जी चांद यांनी 1970 मध्ये आलेल्या मनोज यांच्या ‘पेहचान’ या सिनेमात चंपाची भूमिका साकारली होती. एकीकडे सिग्नचर स्टाइल कॉपी केल्यानं शाहरुख खानवर नाराज झालेल्या मनोज कुमार यांनी त्याच्यावर केस तर दुसरीकडे रणवीरचा अभिनय पाहिल्यावर मात्र त्याला दाद देत रणवीर चांगली मिमिक्री करतो अशी प्रतिक्रिया दिली होती.
रॅम्पवर कियारा अडवाणीचा जलवा, युजर्स म्हणाले, ‘प्रिती चुन्नी ठीक करो’
अभिनेता मनोज कुमार यांना 1992 मध्ये भारत सरकारच्या पद्मश्री पुरस्कारांनं सन्मानित करण्यात आलं. त्याशिवाय त्यांना सिनेसृष्टीतील मानाच्या मानल्या जाणाऱ्या दादासाहेब फाळके पुरस्कारनं गौरवण्यात आलं आहे. ========================================================= VIDEO: आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर पुन्हा बरसला, सखल भागांत साचलं पाणी
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.