मुंबई, 24 जुलै : आय ब्लिंकच्या व्हिडिओमुळे रातोरात स्टार झालेली साउथची अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियर पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमुळे चर्चेत आली आहे. हा व्हिडिओ खरं तर खूप जुना आहे. मात्र तो नुकताच समोर आला असून सध्या त्याची सोशल मीडियावर खूप चर्चा आहे. ज्यात ती ओरु उदार लव्ह या सिनेमाचे सिनेमेटोग्राफर सीनू सिद्धार्थसोबत दिसत आहे. प्रियानं तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेला हा व्हिडिओ सध्या सगळीकडे व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये प्रिया आणि सीनू सिद्धार्थ एकत्र बसलेले दिसत असून सीनूनं प्रियांच्या खांद्यावर हात ठेवला आहे. सुरुवातीला दोघंही एकमेकांकडे पाहतात आणि नंतर ते किस करण्यासाठी एकमेकांच्या जवळ येताना दिसतात. पण त्याचवेळी सीनू किस करण्याऐवजी हातातील बॉटलमधलं पाणी प्यायला सुरुवात करतो आणि प्रियांचा मात्र हिरमोड होतो. या व्हिडिओमधील तिच्या चेहऱ्यावरील भाव पाहण्यासारखे आहेत. सुदैवानं मोठ्या दुर्घटनेतून वाचला दीपिका पदुकोणचा ‘हा’ हिरो
प्रियाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकजण थक्क झाले आहेत. विशेषकरून प्रियाच्या चाहत्यांना तिचा हा अंदाज आवडलेला नाही. तिच्य चाहत्यांनी यावर संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. तिचा एक चाहता मामुमनं लिहिलं, प्लिज असे व्हिडिओ बनवू नकोस, नाहीतर मी मरून जाईन. पण तिचा हा व्हिडिओ अनेक लोकांनी अजब वाटला. अलिया-रणबीरच्या लग्नाचा मुहूर्त नाही पण लेहंगा ठरला!
प्रियाचा हा व्हिडिओ तिचा सिनेमा ओरू उदार लव्ह या सिनेमाच्या शूट वेळचा आहे. या व्हिडिओमध्ये प्रिया तिच्या सिनेमातील कॉस्ट्यूमध्ये दिसत आहे. या सिनेमाची सर्वत्र खूप चर्चा झाली होती कारण यातील प्रियाचा आयब्लिंक व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता. याच व्हिडिओनंतर प्रिया प्रकाश वारियर रातोरात स्टार झाली होती. ज्यामुळे ती सोशल मीडियावर सर्वाधिक सर्च झालेली व्यक्ती बनली होती. तसेच सोशल मीडियावरील तिच्या चाहत्यांमध्ये अचानक वाढ झाली होती. सध्या इन्स्टाग्रामवर प्रियाचे 7 मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. लवकरच प्रिया ‘श्रीदेवी बंगलो’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. Manoj Kumar यांनी असं काय केलं ज्यामुळे त्यांचं नावच बदललं गेलं ============================================================== VIDEO: आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर पुन्हा बरसला, सखल भागांत साचलं पाणी