मुंबई, 23 जुलै : अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या तिच्या आगामी सिनेमाची तयारी करत आहे. बॉलिवूडमध्ये आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दीपिकानं हॉलिवूडमध्येही आपलं नाणं खणखणीत वाजवलं आहे. ‘XXX’ या सिनेमातून दीपिकानं हॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या सिनेमानं परदेशासह भारतातही चांगली कमाई केली होती या सिनेमात ती प्रसिद्धा अभिनेता विन डीजलसोबत दिसली होती. ‘XXX’ मध्ये अॅक्शन अवतारात दिसलेला विन लवकरच त्याचा आगामी सिनेमा ‘फास्ट अँड फ्यूरियस’च्या 9 व्या भागातून प्रेक्षकांसमोर येत आहे. मात्र या सिनेमातील एका स्टंट सीन दरम्यान एका अपघातातून सुदैवानं वाचला आहे.
अभिनेता विन डीजल सध्या ‘फास्ट अँड फ्यूरियस 9’चं शूट पूर्ण करत आहे आणि या सिनेमात तो पुन्हा एकदा अॅक्शन अवतारात दिसणार आहे. या सिनेमात 30 फुट उंचीवरून एक स्टंट करायचा होता. मात्र या स्टंटमध्ये विनच्या जागी बॉडी डबलचा वापर करण्यात येणार होता. मात्र या सीनचं शूट सुरू असताना विनचा बॉडी डबल जो वॉट्स डोक्यावर पडल्यानं त्याला गंभीर दुखापत झाली आहे. ज्यामुळे सध्या तो कोमामध्ये आहे. स्टंट करत असताना उडी मारल्यानंतर त्याची सेफ्टी केबल तुटली आणि तो बऱ्याच उंचीवरून खाली पडला. असं सांगितलं जात आहे. या जागी जर विन असता तर कदाचित त्याला या अपघातात जीवही गमवावा लागला असता.
अलिया-रणबीरच्या लग्नाचा मुहूर्त नाही पण लेहंगा ठरला!
जो ची गर्लफ्रेंडनं तिच्या फेसबुकवर एका पोस्टमध्ये ही घटना सांगितली. तिनं लिहिलं, ही वाईट बातमी ऐकून मला खूप दुःख होत आहे. त्याच्या डोक्याला खूप गंभीर दुखापत झाली आहे. ज्यामुळे तो सध्या कोमामध्ये आहे. त्याची प्रकृती सध्या स्थिर असून त्याला डॉक्टर्सच्या देखरेखेखाली ठेवण्यात आलं आहे. माझं त्यावर खूप प्रेम आहे आणि या वेळी सर्व मित्र आणि कुटुंबीय जो सोबत आहेत आशा करते की, तो लवकरात लवकर यातून बरा होईल.
Birthday Special : 22 वर्षांचा संसार मोडून अभिनेत्यानं केलं गर्लफ्रेंडशी लग्न
सेटवर ही दुर्घटना घडल्यानंतर सिनेमाचं शूटिंग थांबवण्यात आलं आणि जो ला लंडनमधील एका हॉस्पिटल मध्ये भरती करण्यात आलं. ही घटना घडल्यानंतर काही वेळातच विन त्या ठीकणी आला. ही बातमी ऐकल्यावर त्याच्या डोळ्यातही पाणी आलं. त्यानं जोची परिस्थिती पाहिली. ही घटना 22 जुलैला दुपारी घडली असं तिथल्या एका प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं. रॅम्पवर कियारा अडवाणीचा जलवा, युजर्स म्हणाले, ‘प्रिती चुन्नी ठीक करो’ ============================================================= VIDEO: गायिका वैशाली माडे ‘या’ कारणामुळे पडली बिग बॉसच्या घरातून बाहेर