मुंबई, 05 जून: मुकेश अंबानी ( Mukesh Ambani) यांचा मुलगा 'आकाश अंबनी' (Akash Ambani) आणि 'श्लोका मेहता' ( Shloka Mehta) यांच्या लग्नात आपल्या नृत्याविष्काराने चर्चेत आलेली नृत्यांगना म्हणजे राधिका मर्चंट ( Radhika Merchant) राधिका ही प्रसिद्ध भरतनाट्यम नृत्यांगना (Bharatnatyam Dancer) असून राधिका आज भरतनाट्यम नृत्य प्रकारात अरंगेत्रम (Arangetram Ceremony ) पूर्ण करणार आहे. अरंगेत्रम म्हणजेच भरतनाट्यम नृत्याच्या शिक्षणातील शेवटची पदवी असते. सोप्या भाषेत याचा अर्थ भरतनाट्यम नृत्यात मास्टर्स ( Masters In Bharatnatyam) करणे असा होतो. राधिकाचा अरंगेत्रम सोहळा आज जिओ वर्ल्ड सेंटरच्या ग्रँड थिएटरमध्ये (Jio World Center Grand Theatre) संध्याकाळी 6 वाजता पार पडणार आहे. या सोहळ्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray) सहकुटुंब उपस्थित राहणार आहेत. तसेच सलमान खान (Salman Khan) आणि आमिर खानसह (Aamir Khan) अनेक बॉलिवूड सेलिब्रेटी हजेरी लावणार आहेत. सोहळा नीता अंबानी (Neeta Ambani) आणि मुकेश अंबानी होस्ट करणार आहेत.
राधिका मर्चंड अंबानी कुटुंबातील सगळ्या महत्त्वाच्या कार्यक्रमांना उपस्थित असते. काही महिन्यांपूर्वी मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी (Isha Ambani) आणि पीरामल ग्रुपचे अजय पीरामल यांचा मुलगा आनंद (Aanand) यांचा साखरपुडा झाला त्यानिमित्ताने एंटिलियावर एक लॅविश पार्टी आयोजित करण्यात आली होती. त्या पार्टीत राधिका 'पद्मावती' सिनेमातील 'घूमर' गाण्यावर डान्स करताना दिसली होती.
हेही वाचा - OMG! अभिषेकला नाचताना बघून ऍशला आवरला नाही मोह; असं काही केलं की प्रेक्षकही झाले दंग
कोण आहे राधिका मर्चंट?
राधिका मर्चंट ही वीरेन मर्चंट यांची मुलगी असून वीरेन हे विरेन मर्चंट ADFफूड्स लिमिटेड कंपनीचे एक्झिक्यूटिव्ह डायरेक्टर आहेत. त्याचप्रमाणे ते एन्कोर हेल्थकेयर प्राइव्हेट लिमिटेड कंपनीचे सीईओ आणि वाइस चेअरमन आहेत. राधिका ही अनेक वर्ष 'श्री निभा आर्ट आर्ट फाउंडेशन'च्या संस्थापिका 'गुरू भावना ठाकर' यांच्याकडे भरतनाट्यमचं शिक्षण घेत आहे (Disciple of Guru Bhavana Thakar - Founder of Shree Nibha Arts ) राधिकानं न्यूयॉर्क यूनिव्हर्सिटीमधून शिक्षण घेतलं आहे. राधिकाला ट्रेकिंग आणि स्विमींग करणं आवडतं.
काय आहे अरंगेत्रम?
अरंगेक्रम हा एक तमिळ शब्द आहे. भारतीय शास्त्रीय नृत्यप्रकारातील भरतनाट्यम या नृत्यप्रकारात वर्षानुवर्ष शिक्षण घेतल्यानंतर रंगमंचावर आपल्या गुरुसमोर कला सादर केली जाते. सोप्या भाषेत अरंगेत्रम म्हणजे पदवीदान समारंभ. भरतनाट्यम, मोहिनी अट्टम, कथकली आणि मणिपूरी या नृत्यप्रकारात अखेरच्या पदवीदान समारंभाला अरंगेत्रम असे म्हणतात. अरंगेत्रम म्हणजे भरतानाट्यममधील मास्टर्स. एका शिष्याच्या आयुष्यातील अरंगेत्रम हा सोहळा फार महत्त्वाचा सोहळा असतो. गुरू त्याच्या शिष्याला जगासमोर उभा करतो आणि त्याने इतके वर्ष घेतलेली मेहनत आणि कला सर्वांसमोर सादर करतो. गुरूसाठीही हा सोहळा महत्त्वाचा आणि मानाचा असतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood News, Dancer, Mukesh ambani, Neeta ambani, Reliance Jio