मुंबई 5 जून: सध्या सगळीकडेच IIFA अवॉर्ड्सची तुफान चर्चा आहे. (IIFA awards 2022) काल दुबई येथे पार पडलेल्या या दिमाखदार सोहळ्याला अनेक मोठमोठ्या स्टार्सनी हजेरी लावली होती. झगमगत्या ताऱ्यांच्या परफॉर्मन्सनी सजलेली ही संध्यकाळ अनुभवण्यासाठी प्रेक्षक अगदी उत्सुक होते. अनेक मोठ्या स्टार्सच्या नावांमध्ये (Abhishek Bachchan- Aishwarya Rai Bachchan) अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय-बच्चन यांचं सुद्धा नाव होतं. ऍश आणि अभि ही जोडी सगळ्यांनाच कायम आवडत आली आहे. मात्र या जोडीने या अवॉर्ड सोहळ्यात असं काही केलं ज्याने प्रेक्षक सुद्धा पाहून दंग झाले.
नोरा फतेही, अनन्या पांडे यांच्यासोबतच अभिषेक बच्चन सुद्धा यावर्षी IIFA सोहळ्यात धमाकेदार डान्स परफॉर्मन्स करताना दिसला. अभिषेकचा आणि नृत्याचा फारसा संबंध आला नसल्याने या धमाकेदार परफॉर्मन्समुळे सगळ्यांना विशेषतः अभिषेकच्या चाहत्यांना खूप आनंद झाला.
या डान्स परफॉर्मन्समध्ये अभिषेक स्टेजवरून खाली येऊन प्रेक्षकांमध्ये नृत्य करू लागला. तेव्हा आपल्या पतीला डान्स करताना पाहून ऍशला सुद्धा मोह आवरला नाही आणि तीसुद्धा अभिषेकसोबत डान्स करू लागली. बाजीराव मस्तानी चित्रपटातील मल्हारी गाण्यावर अभिषेकसोबत ऐश्वर्या आणि छोटी आराध्या सुद्धा सामील होऊन नृत्य करू लागले.
बच्चन फॅमिलीचा हा खास आणि अफलातून डान्स पाहून प्रेक्षक सुद्धा भरभरून दाद होत असलायची दृश्य पाहायला मिळत आहेत. या गाण्याचा धमाकेदार विडिओ सुद्धा IIFA च्या ऑफिशियल पेजवरून शेअर करण्यात आलं आहे. हा विडिओ सध्या अनेकांच्या चर्चेचा विषय ठरत आहे. ऍश अभि आणि आराध्या या बच्चन कुटुंबातील तीन महत्ताच्या सदस्यांचा विडिओ बघून अनेकांनी त्यांचं प्रचंड कौतुक केलं आहे.
View this post on Instagram
अभिषेक-ऐश्वर्या त्यांचे खास husband wife goals दिमाखात मिरवताना दिसत आहेत. हे पाहून अनेकांनी त्यांच्या जोडीचं तोंड भरून कौतुक केलं आहे. त्यांचं एकमेकांशी असलेलं नातं फार खास आहे. ही जोडी मीडियासमोर सुद्धा आपलं प्रेम अनेकदा flaunt करताना दिसली आहे. त्यांची लव्हस्टोरी सुद्धा बरीच खास आहे असं म्हणलं जातं.
हे ही वाचा- Sai Tamhankar in IIFA: परम सुंदरीनं दिमाखात पटकवलं अवॉर्ड, IIFAमध्ये वाजला मराठीचा डंका
IIFA सोहळ्यात यावर्षी अनेक मराठी स्टार्सनी सुद्धा हजेरी लावली होती. सई ताम्हणकर, अमृता खानविलकर अशा अनेक कलाकारांच्या उपस्थितीने या सोहळ्याची रंगत आणखीनच वाढली. मराठी प्रेक्षकांना खूप आनंद होईल आणि अभिमान वाटेल अशा अनेक गुड न्यूजसुद्धा या सोहळ्यातून मिळाल्या आहेत. IIFA चा यावर्षीचा सोहळा एकदम खास असणार आहे हे मात्र नक्की.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Abhishek Bachchan, Aishwarya rai, Bollywood actor, Bollywood actress, Bollywood News