रणबीर कपूर आणि दीपिकाच्या ‘ये जवानी है दिवानी’मध्ये महत्वाच्या भूमिकेत दिसलेली अभिनेत्री म्हणजे एव्हलिन शर्मा.
‘ये जवानी है दिवानी’मधून तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली होती.
एव्हलिन शर्माने 15 मे 2021 रोजी एका खाजगी समारंभात तुषान भिंडीशी लग्न केले. त्याच वर्षी नोव्हेंबरमध्ये, अभिनेत्रीने एका सुंदर मुलीला जन्म दिला.
एव्हलिनच्या मुलीचं नाव अवा असं आहे.
आता एव्हलिन शर्माने एका मुलाला जन्म दिला आहे. एव्हलिन शर्माने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर मुलाचा एक फोटो शेअर केला आहे.
एव्हलिनने त्यांच्या मुलाचं नाव ‘आर्डन भिंडी’ असं ठेवलं आहे. तिच्यावर चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
सध्या एव्हलिन बॉलिवूडपासून दूर परदेशात ऑस्ट्रेलियात पतीसोबत राहते.
अभिनयापासून दूर एव्हलिन एक पॉडकास्ट चालवते ज्यात ती विविध पाहुण्यांना विचार मांडण्याची संधी देते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.