मुंबई, 21 जुलै : बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रानं नुकताच तिचा 37 वा वाढदिवस साजरा केला. लग्नाच्या नंतरचा प्रियांकाचा हा पहिलाच वाढदिवस होता. प्रियांकाचा वाढदिवस खास असावा यात पती निक जोनसनं काहीही कसर सोडली नाही. पण दरम्यान आता प्रियांका सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. प्रियांकाचा सिगरेट ओढतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं सध्या सगळीकडेच चर्चेत आली आहे. खरं तर सोशल मीडियावर ट्रोल होणं तिच्यासाठी नवीन नाही मात्र यावेळी सिगरेट ओढताना हा फोटो पाहून नेटकऱ्यांनी तिला टार्गेट केलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोमध्ये प्रियांका चोप्रा तिचा पती निक जोनस आणि आई मधू चोप्रा यांच्या सोबत एका बोटमध्ये बसली असून यावेळी हे तिघंही सिगरेट ओठताना दिसत आहेत. यावरून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. मागच्या वर्षी दिवाळीच्या फटाक्यांच्या संदर्भातील तिच्या व्हिडिओची आठवण करुन देत युजर्स आता प्रियांकावर टीका करत आहेत. या व्हिडिओमध्ये प्रियांकानं तिला अस्थमा असल्याचा उल्लेख केला होता त्यामुळे आता सिगरेट ओढल्यावर तुला त्रास होत नाही का असा प्रश्न सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रियांकाला विचारला जात आहे.
वेब सीरिजमधील बोल्ड सीननंतर प्रिया बापटनं केलं हटके फोटोशूट
प्रियांकावर टीका करताना एका युजरनं लिहिलं, दिवाळी फटाके फोडल्यास प्रियांका अस्थमा असल्यास सांगते, मग पती आणि आईसोबत बसून सिगरेट ओढताना तिला अस्थमा आहे हे ती विसरली आहे का? तर दुसऱ्या एकानं तिला भारतीय संस्कृतीची आठवण करून देत आईसोबत बसून सिगरेट ओढायला तुला लाज वाटत नाही का असा प्रश्न विचारला आहे. आणखी एका युजरनं लिहिलं, ही तिच प्रियांका चोप्रा आहे का? जी दरवर्षी दिवाळीला फटाक्यांच्या धुराचं ज्ञान देत असते.
फिटनेस टिप्स : प्रेग्नंसीनंतर अभिनेत्री सौम्या टंडननं असं केलं वजन कमी
प्रियांकाच्या 37 व्या वाढदिवसाला पती निक जोनसन तिच्या ग्रँड सेलिब्रेशनमध्ये अजिबात कसर सोडली नाही. मियामी बीचवरील तिच्या बर्थडे सेलिब्रेशनचे फोटो सगळीकडे व्हायरल झाले होते. तिच्या बर्थडेला बहीण परिणिती चोप्रानंही हजेरी लावली होती. तर निकनं सुद्धा प्रियांकाला हटके अंदाजात वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. निकनं प्रियांकाचा देसी लुकमधील फोटो त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर करत त्या फोटोला, ‘माझ्या आयुष्यात अंधार मिटवणारी तू, वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा, ‘आय लव्ह यू’ असं कॅप्शन दिलं होतं. OMG! पैशांसाठी बहिणीचे फोटो विकायचा सनी लिओनीचा भाऊ ========================================================== SPECIAL REPORT: विहीर नाही तर पाणी चोरीला गेलं; ग्रामस्थांवर राखण करण्याची वेळ