टीव्ही अभिनेत्री सौम्या प्रेग्नंसीनंतर सध्या तिच्या फिटनेसमुळे सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. तिनं नुकतेच काही फोटो तिच्या इन्स्टाग्रमावर शेअर केले आहेत ज्यातून ती परफेक्ट फिटनेस गोल्स देत आहे.
सौम्यानं प्रेग्नंसीनंतर पुन्हा एकदा शोमध्ये कमबॅक केलं. यावेळी दिलेल्या एका मुलाखतीत तिनं तिच्या फिटनेस आणि प्रेग्नंसीनंतरच्या फास्ट ट्रान्सफॉर्मेशनबाबत गप्पा मारल्या.
'आयबी टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत सौम्यानं तिचा प्रेग्नंसी एक्सपिरियन्स आणि त्यानंतरच्या फिटनेसचं रुटीनं सांगितलं.
सौम्या म्हणाली, ‘खरं सांगायचं तर याचं काही खूप मोठं सिक्रेट नाही आहे. कारण माझं वजन काही जास्त वाढलं नव्हतं. जवळपास 12-13 किलो वजन वाढलं होतं त्यामुळे ते कमी करताना मला जास्त समस्या आल्या नाहीत.’
बाळाच्या जन्मानंतर मी काही दिवसांतच लहान-लहान एक्सरसाइझ करायला सुरुवात केली होती. तसेच डिलिव्हरीच्या 10 दिवसांनंतरच मी चालायला सुरुवात केली होती. असं मी 40 दिवस केलं.
सौम्या पुढे सांगते, त्यानंतर मी पिलेट्स आणि फिजियोथेरपी एक्सरसाइझ करायला सुरुवात केली होती. कारण मला पाठदुखीचा प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.
याशिवाय या मुलाखातीत सौम्यानं तिचा डाएट प्लानसुद्धा सांगितला. ती म्हणाली, मी माझ्या डाएटवर जास्त लक्ष दिलं होतं. मी खूप काही करत नव्हते पण माझ्या डॉक्टर्सनी सांगितलेल्या सर्व गोष्टी मी ऐकत असे.
मी नियमीत हलका-फुलका व्यायाम करत असे आणि 40 दिवसांनंतर मी पिलेट्स आणि फिजियोथेरपीवर लक्ष केंद्रीत केलं ज्यामुळे मला पुन्हा एकदा हव्या त्या शेपमध्ये परत येणं शक्य झालं.
प्रेग्नंसीनंतर सेटवर परतण्याच्या अनुभवाबद्दल ती म्हणाली, जुन्या मित्रमंडळींना भेटणं आणि सेटवर परत येणं माझ्यासाठी खूप चांगला अनुभव होता. इथे पण खूप लोकांच्या आयुष्यात वेगवेगळे बदल झाले आहेत. त्यामुळे त्यांना भेटून त्यांच्या आनंदात समील होणं हा खरंच चांगला अनुभव आहे.