मुंबई, 10 मे: बॉलिवूड ते हॉलिवूड असा प्रवास करणारी अभिनेत्री म्हणजे प्रियांका चोप्रा. सध्या ती तिच्या आगामी चित्रपट आणि वेब सीरिजमुळे सतत चर्चेत असते. नुकतीच तिची ‘सिटाडेल’ ही हॉलिवूडची वेब सिरीज प्रदर्शित झाली आहे. तसेच सध्या प्रमोशनल इव्हेंट्समध्ये ती अशी विधाने करते की सर्वत्र त्यांची चर्चा होऊ लागते. प्रियांकाचं आजवर बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्यांसोबत नाव जोडलं गेलं आहे. यामध्ये प्रामुख्याने शाहिद कपूर आणि शाहरुख खान यांचा समावेश होतो. आता नुकतंच प्रियंकाने आपल्या पूर्वीच्या नात्याबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे. प्रियांका चोप्रा पती निक जोनाससोबत वैवाहिक जीवनाचा आनंद घेत आहे. दोघांनी 2018 मध्ये लग्न केले आणि गेल्या वर्षी सरोगसीद्वारे मुलगी मालती मेरीचा जन्म झाला. प्रियांका जेव्हा हिंदी चित्रपटसृष्टीत काम करत होती, तेव्हा तिचे नाव अनेक अभिनेत्यांशी जोडले गेले होते. आता तिने निकचे कौतुक केले आहे आणि तो आपला सर्वात मोठा चीअरलीडर असल्याचे म्हटले आहे. एवढंच नाही तर तिने निकसमोर तिच्या भूतकाळातील सर्व नातेसंबंध उघड केले.
‘कॉल हर डॅडी पॉडकास्ट’च्या ताज्या एपिसोडमध्ये प्रियंका चोप्राला विचारण्यात आले की, ‘तिचा रोमँटिक जोडीदार निवडण्यात काही पॅटर्न आहे का?’ यावर उत्तर देताना अभिनेत्री म्हणाली, ‘मी एकामागून एक रिलेशनशिपमध्ये होते. सगळ्या नात्यांमध्ये मी स्वतःला अजिबात वेळ दिला नाही. मी ज्या अभिनेत्यांसोबत काम केले आहे किंवा ज्यांना मी सेटवर भेटले आहे त्यांना मी नेहमीच डेट केले आहे. नातं कसं असावं याची कल्पना मला होती आणि मी तेच शोधत राहिले. जे माझ्या आयुष्यात आले, त्यांना मी माझ्या त्या ‘नात्याच्या कल्पनेत’ पाहत राहिले.’ असं तिने सांगितलं. The Kerala Story बाबत मोठी बातमी! भारतात वाद सुरु असताना आता परदेशात पहिला जाणार चित्रपट प्रियंका चोप्राने तिच्या मागील नातेसंबंधात वारंवार त्याच केलेल्या चुकांबद्दलही सांगितले. याविषयी बोलताना तिने, या चुकांमुळे त्या नात्यात मला मी फक्त ‘पायपुसणं’ असल्यासारखं वाटत राहिलं, असं म्हटलं आहे. ती म्हणाली, ‘त्याच चुका पुन्हा पुन्हा केल्याने मला नेहमीच मी फक्त एखादी केयरटेकर असल्यासारखं वाटलं, मी स्वतःसाठी कधीच उभी राहिले नाही याची जाणीव झाली.’ अभिनेत्री पुढे म्हणाली, ‘मी अक्षरशः पायपुसण्यासारखी झाले असते. मी प्रत्येक गोष्टीकडे दुर्लक्ष करायचे. कारण महिलांना इतके दिवस सांगितले गेले आहे की तुम्हाला कुटुंबाला एकत्र ठेवायचंय आणि नवरा घरी आल्यावर त्याला आनंद द्यायचं. त्यामुळेच मी सहन करत राहिले.’ वर्क फ्रंटवर प्रियांका चोप्रा अॅमेझॉनच्या वेब सीरिज ‘सिटाडेल’ आणि रोमँटिक ड्रामा फिल्म ‘लव्ह अगेन’मध्ये दिसली होती. याशिवाय ती फरहान अख्तरच्या ‘जी ले जरा’मध्ये कतरिना कैफ आणि आलिया भट्टसोबत दिसणार आहे.