मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Priyanka Chopra च्या लेकीचा पहिला फोटो आला समोर, हॉस्पिटलमधून 100 दिवसांनी परतली घरी

Priyanka Chopra च्या लेकीचा पहिला फोटो आला समोर, हॉस्पिटलमधून 100 दिवसांनी परतली घरी

प्रियांका-निकची मुलगी मालती मेरी चोप्रा जोनास (Malti Marie Chopra Jonas) 100 दिवसांनंतर अखेर घरी परतली आहे. यानिमित्ताने जोडप्याने त्यांच्या मुलीसोबतचा पहिला (Priyanka Chopra Daughter Photo) फोटो पोस्ट केला आहे

प्रियांका-निकची मुलगी मालती मेरी चोप्रा जोनास (Malti Marie Chopra Jonas) 100 दिवसांनंतर अखेर घरी परतली आहे. यानिमित्ताने जोडप्याने त्यांच्या मुलीसोबतचा पहिला (Priyanka Chopra Daughter Photo) फोटो पोस्ट केला आहे

प्रियांका-निकची मुलगी मालती मेरी चोप्रा जोनास (Malti Marie Chopra Jonas) 100 दिवसांनंतर अखेर घरी परतली आहे. यानिमित्ताने जोडप्याने त्यांच्या मुलीसोबतचा पहिला (Priyanka Chopra Daughter Photo) फोटो पोस्ट केला आहे

  • Published by:  Janhavi Bhatkar

न्यूयॉर्क, 09 मे: प्रियांका चोप्रा आणि निक जोनास (Priyanka Chopra and Nick Jonas) यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर या मातृदिनी काही खास पोस्ट शेअर केल्या आहेत. त्यांची मुलगी मालती मेरी चोप्रा जोनास (Malti Marie Chopra Jonas) 100 दिवसांनंतर अखेर घरी परतली आहे. यानिमित्ताने जोडप्याने त्यांच्या मुलीसोबतचा पहिला (Priyanka Chopra Daughter Photo) फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये प्रियंका तिच्या मुलीला घट्ट मिठीत धरून बसलेली दिसत आहे तर निक त्याच्या चिमुरड्या राजकुमारीकडे पाहत आहे. ही पोस्ट करताना प्रियांकाने म्हटले आहे की त्यांची मुलगी प्रीमॅच्युअर जन्मली होती आणि ती 100 दिवसांपेक्षा अधिक काळ NICU (नवजात अतिदक्षता विभागात) मध्ये होती. अभिनेत्रीने लांबलचक पोस्ट करत या 'rollercoaster' चे विशेष वर्णन केले आहे. जोनास कुटुंबाचा हा फोटो फारंच गोड आहे.

प्रियांका चोप्राने केलेल्या पोस्टमध्ये असं म्हटलं आहे की, 'मातृदिनाच्या निमित्ताने मला तुम्हाला सांगावेसे वाटते की, गेले काही दिवस आमच्यासाठी रोलर कोस्टरसारखे होते. याचा अनुभव अनेक लोकांनी घेतला असेल, याची कल्पना आम्हाला. NICU मध्ये 100 हून अधिक दिवस राहिल्यानंतर अखेर आज आमची चिमुरडी घरी आली आहे.'

हे वाचा-'नावात पिनकोड पण जोडा...', प्रियांकाच्या लेकीच्या लांबलचक नावामुळे मीम्सचा पाऊस

अभिनेत्रीने पुढे म्हटलं आहे की, प्रत्येक कुटुंबाचा प्रवास हा अनोखा असतो आणि त्यासाठी विश्वास आवश्यक असतो, आणि आमचा गेल्या काही महिन्यांचा प्रवास आव्हानात्मक असताना, प्रत्येक क्षण किती मौल्यवान आणि परिपूर्ण आहे याची जाणीव होते आहे. आमची लहान मुलगी अखेर घरी आली याचा आम्हाला खूप आनंद झाला आहे आणि आम्ही Rady Children's La Jolla आणि Cedar Sinai, Los Angeles मधील प्रत्येक डॉक्टर, नर्स आणि तज्ज्ञांचे आभार मानू इच्छितो, जे यावेळी प्रत्येक पायरीवर निस्वार्थपणे उभे होते. आमचा पुढील अध्याय आता सुरू होत आहे, आणि आमचे बाळ खरोखरच लढवय्या आहे.  MM आता पुढे जाऊया! आई आणि बाबांचे तुझ्यावर प्रेम आहे.'

View this post on Instagram

A post shared by Priyanka (@priyankachopra)

अभिनेत्रीने तिच्या चाहत्यांना मातृदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत तर तिने निक जोनसचे देखील यावेळी आभार मानले आहे. 'मी तुझ्याशिवाय हे कुणासह देखील करू शकले नसते, मला आई बनवण्यासाठी निक तुझे आभार. I Love You', अशा शब्दात तिने निकचे आभार मानले आहेत.

हे वाचा-देसी गर्ल प्रियांका चोप्राला अमृता खानविलकरच्या 'चंद्रमुखी'ची भुरळ, 'चंद्रा'साठी खास ट्वीट चर्चेत!

ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा आणि निक जोनास (Priyanka Chopra and Nick Jonas Baby Name) यांनी काही महिन्यांपूर्वी सरोगसीद्वारे आपल्या मुलीचे स्वागत केले. त्यांनी मुलीचे नाव मालती मेरी चोप्रा जोनास असे ठेवले आहे. एवढे मोठे नाव ठेवल्याने हे कपल ट्रोल देखील झाले होते, पण त्यांनी दोन्ही संस्कृतीचा मेळ साधत हे नाव ठेवल्याचे बोलले जाते. मुलीच्या नावामध्ये भारतीय नावाचाही उल्लेख केल्याने प्रियांका-निकचे कौतुकही होत आहे. त्यांच्या मुलीच्या नाव खूप अर्थपूर्ण आहे. मालती हा मुळचा संस्कृत भाषेतील शब्द आहे ज्याचा अर्थ "सुवासिक फूल" किंवा "चांदणे" असा आहे.

First published:

Tags: Nick jonas, Priyanka chopra