Home /News /entertainment /

Malti Marie Chopra Jonas: 'नावात पिनकोड पण जोडा...', प्रियांकाच्या लेकीच लांबलचक नावामुळे मीम्सचा पाऊस

Malti Marie Chopra Jonas: 'नावात पिनकोड पण जोडा...', प्रियांकाच्या लेकीच लांबलचक नावामुळे मीम्सचा पाऊस

Priyanka Chopra

Priyanka Chopra

ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा आणि निक जोनास (Priyanka Chopra and Nick Jonas Baby Name) यांनी त्यांच्या मुलीचे नाव मालती मेरी चोप्रा जोनास (Malti Marie Chopra Jonas) असे ठेवले आहे. त्यावरुन सोशल मीडियावर पाऊस पडला आहे

  मुंबई, 21 एप्रिल: ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा आणि निक जोनास (Priyanka Chopra and Nick Jonas Baby Name) यांनी त्यांच्या मुलीचे नाव मालती मेरी चोप्रा जोनास (Malti Marie Chopra Jonas) असे ठेवले आहे. TMZ ने याविषयी वृत्त दिले आहे. या दोघांनी 3 महिन्यांपूर्वी सरोगसीद्वारे आपल्या मुलीचे स्वागत केले आणि त्यांच्या चाहत्यांना आनंदित केले होते. त्यांनी त्यांच्या अपत्याबाबत माहिती गुलदस्त्यात ठेवली होती, तिने नावही अद्याप समोर आले नव्हेत. मात्र या आउटलेटने मिळवलेल्या जन्म प्रमाणपत्रानुसार, त्यांच्या मुलीचा जन्म 15 जानेवारी रोजी रात्री 8 वाजल्यानंतर झाला. सॅन दिएगो, कॅलिफोर्निया याठिकाणच्या रुग्णालयात बाळाचा जन्म झाला. दरम्यान आज प्रियांका आणि निकच्या बाळाचे नाव उघड झाले आहे. त्यानंतर ट्विटर आणि इंस्टाग्राम सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मीम्सचा पूर आला आहे. सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
  39 वर्षीय अभिनेत्री आणि 29 वर्षीय जोनास यांनी जानेवारीमध्ये त्यांच्या बाळाच्या आगमनाची बातमी जाहीर केली. त्यांनी मुलीचे नाव मालती ठेवल्यानंतर सोशल मीडिया संमिश्र प्रतिक्रिया येत आहे. काहींनी मुलीच्या नावामध्ये भारतीय नावाचाही उल्लेख केल्याने प्रियांका निकचे कौतुक होत आहे. तर मालती मेरी चोप्रा जोनास एवढे मोठे लांबलचक नाव निवडल्याने त्यावर मीम्सही शेअर केले आहेत. त्यांच्या मुलीच्या नाव खूप अर्थपूर्ण आहे. मालती हा मुळचा संस्कृत भाषेतील शब्द आहे ज्याचा अर्थ "सुवासिक फूल" किंवा "चांदणे" असा आहे.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published:

  Tags: Nick jonas, Priyanka chopra

  पुढील बातम्या