मुंबई, 26 एप्रिल- विश्वास पाटील यांच्या ‘चंद्रमुखी’ (Chandramukhi ) या कादंबरीवर आधारित बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘चंद्रमुखी’ हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटात दिलखेचक अदांनी सर्वांना घायाळ करणाऱ्या नृत्यांगणेची प्रमुख भूमिका अभिनेत्री अमृता खानविलकर साकारली आहे. अमृताच्या भूमिकेचे सध्या कौतुक होत आहे. लवकरच हा सिनेमाच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचं सध्या जोरदार प्रमोशन सुरू आहे.चंद्रमुखी चित्रपटाला प्रदर्शनाआधीच मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया मिळत आहेत. चित्रपटाची गाणी आणि ट्रेलरला तुफान प्रतिक्रिया मिळताना दिसत आहेत. यातच विविध कलाकारांकडून या चित्रपटाला शुभेच्छा देखील मिळत आहेत. बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा ( priyanka chopra ) हिला देखील चंद्रमुखीची भुरळ पडली आहे. तिनं खास ट्वीट करत सिनेमाच्या टीमला शुभेच्छा दिल्या आहेत.
प्रियांका चोप्रानं ट्वीट करत म्हटलं आहे की, अभिनंदन आदिनाथ कोठारे, 29 एप्रिलला चंद्रमुखी पाहा तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात" असं म्हणत प्रियांकाने शुभेच्छा दिल्या आहेत. प्रियांकाने आदिनाथ कोठारेचं अभिनंदन करणारं ट्विट केलं आहे.
वाचा-'हल्ली सिनेमात काम इन्स्टा फॉलोअर्सची संख्या पाहून मिळते' प्राजक्ताची पोस्ट
चंद्रमुखी हा सिनेमा लावणीसम्राज्ञीच्या आयुष्यावर बेतला आहे. यात अमृता खानिलकर चंद्राची भूमिका साकारताना दिसत आहे. तर अभिनेता आदिनाथ कोठारे दौलतराव देशमाने ह्या ध्येयधुरंदर राजकारण्याच्या भूमिकेत पाहायला मिळतोय. सध्या सर्व स्तारातून अमृतानं साकारलेल्या चंद्राचे कौतुक होत आहे.
Congratulations @adinathkothare. Check out Chandramukhi on 29th April. Theaters near you.@AmrutaOfficialK, @TheChandramukhi, @prasadoak17, @akshayent, @PlanetMarathi https://t.co/R2zEBlOeI3 https://t.co/5oW90ghXq2
— PRIYANKA (@priyankachopra) April 26, 2022
'चंद्रा' गाण्याची सोशल मीडियावर देखील चांगलीच क्रेझ पाहायला मिळत आहे. या गाण्याला रिलीज झाल्याच्या काही दिवसातच 2 मिलियन पेक्षा (2 Million views ) जास्त प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. सोशल मीडियावर या गाण्यावर विविध रील्स पाहायला मिळतात. प्रेक्षकांना देखील सिनेमा पाहण्याची उत्सुकता लागली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood News, Entertainment, Marathi entertainment, Priyanka chopra