जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Priyanka Chopra: 'मी त्यांना कधीच माफ...' बॉलिवूड मधील बॉयकॉट करणाऱ्या गॅंगविषयी स्पष्टच बोलली प्रियांका चोप्रा

Priyanka Chopra: 'मी त्यांना कधीच माफ...' बॉलिवूड मधील बॉयकॉट करणाऱ्या गॅंगविषयी स्पष्टच बोलली प्रियांका चोप्रा

प्रियांका चोप्रा

प्रियांका चोप्रा

प्रियांका चोप्राने बॉलिवूडच्या राजकारणाला कंटाळत इथून बाहेर निघण्याचा निर्णय घेतल्याचा खुलासा केला होता. त्यानंतर आता तिने एवढ्या वर्षानंतरच का बॉलिवूडची पोलखोल केली याबाबत खुलासा केला आहे. बॉलिवूडबाबत केलेलं तिचं वक्तव्य पुन्हा चर्चेत आलं आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 04 एप्रिल:  बॉलिवूडपासून हॉलिवूड पर्यंत आपली वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे प्रियांका चोप्रा. प्रियांका आता हॉलिवूडमध्ये सतत सक्रिय आहे. तिने ग्लोबल स्टार म्हणून ओळख मिळवली आहे. प्रियांकाला हॉलिवूडमध्ये चांगलं यश मिळत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रियांका बॉलिवूडपासून दूर आहे. भिनेत्रीचे चाहते तिला पुन्हा हिंदी सिनेमांमध्ये पाहण्यासाठी उत्सुक आहेत.  पण प्रियांकाने बॉलिवूड का सोडलं यासंबंधीचा खुलासा तिने मध्यंतरी केला होता. तिने बॉलिवूडच्या राजकारणाला कंटाळत इथून बाहेर निघण्याचा निर्णय घेतल्याचा खुलासा केला होता. त्यानंतर आता तिचं बॉलिवूडबाबत केलेलं वक्तव्य पुन्हा चर्चेत आलं आहे. काही दिवसांपूर्वी प्रियांका चोप्राने बॉलिवूडचं भयाण वास्तव सगळ्यांसमोर आणलं होतं. ती म्हणाली होती की, ‘बॉलिवूडमध्ये तिला हवं तसं काम मिळत मिळत होतं त्यामध्ये ती अजिबात खुश नव्हती. त्यामुळे ती बॉलिवूडमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होती. आणि या इंडस्ट्रीतून बाहेर पडण्याचा मार्ग शोधत होती. यामागे आणखी एक धक्कादायक कारण होतं. अभिनेत्रीने याबाबत सांगितलं की, ‘तेव्हा मला इंडस्ट्रीत (बॉलिवूड) एका कोपऱ्यात ढकललं जात होतं. लोक मला कास्ट करत नव्हते. मला त्या गोष्टीची अडचण होती. मी हा खेळ आणखी खेळू शकत नव्हते. कारण मी त्यातली खेळाडू नव्हते. आणि मी या इंडस्ट्रीतील राजकारणाला कंटाळले होते. मला या सगळ्यातून विश्रांतीची गरज होती. आणि मला जगाच्या दुसऱ्या बाजूला जाण्याची संधी मिळाली आणि मी ती घेतली.’ असा खुलासा तिने केला होता. Parineeti Chopra Wedding: परिणीती आणि राघव चढ्ढांच्या लग्नाबाबत मोठी अपडेट! ‘या’ ठिकाणी सुरु झालीये साखरपुड्याची तयारी आज प्रियांकाने हॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. तिच्या हॉलिवूडमधील कामाबद्दल आत्मविश्वास निर्माण झाल्यानंतर अभिनेत्रीने बॉलिवूडबद्दल आपलं मन मोकळं केलं. सोमवारी प्रियंका सिटाडेलच्या प्रमोशनसाठी तिचा को-स्टार रिचर्ड मॅडेनसोबत पोहोचली होती. येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना, देसी गर्लला विचारण्यात आले की तिने आता इतक्या वर्षांनंतर बॉलीवूडचे राजकारण लपवून का ठेवले? याला उत्तर देताना प्रियंका म्हणाली ‘मी फक्त माझ्या आयुष्यातील प्रवासाविषयी सत्य सांगितलं. आता मी माझ्या आयुष्याच्या त्या टप्प्याबद्दल बोलण्यास तयार झाली  आहे असं मला वाटलं.’

जाहिरात

आता तिच्यासोबत जे काही झाले ते विसरून आयुष्यात पुढे गेल्याचे अभिनेत्रीने सांगितले. ती म्हणाली कि, ‘आज मी कुठे आहे, मला काय वाटते ते मी सांगू शकते. कारण माझ्या प्रवासात अनेकांनी अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. मग मी आता त्या लोकांना  माफ केलं. मी खूप पूर्वीचं या सगळ्याला मागे सोडलं आहे.  मी ते सगळं शांतपणे हाताळले आहे. मला असे वाटते की त्यामुळेच आता याबद्दल उघडपणे बोलणे माझ्यासाठी सोपे झाले आहे.’ असं मत अभिनेत्रीने व्यक्त केलं आहे.

News18लोकमत
News18लोकमत

प्रियांकाने बॉलिवूडबद्दल तिचं कटू सत्य सांगितल्यापासून अनेक सेलिब्रिटींनी अभिनेत्रीला पाठिंबा दिला आहे. कंगना राणौत, शेखर सुमन यांसारख्या अनेक कलाकारांनी प्रियांकाला पाठिंबा देताना इंडस्ट्रीवर टीका केली आहे. कंगना रणौतने प्रियांकाच्या बाबतीत जे काही घडले त्यासाठी करण जोहरला जबाबदार धरले. कंगनाने करण जोहरला माफिया म्हणत अनेक ट्विट केले होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात