मुंबई, 21 जून- सुष्मिता सेनचा भाऊ राजीवने टीव्ही अभिनेत्री चारू असोपाशी बंगाली आणि राजस्थानी या दोन पद्धतीने लग्न केलं. गोव्यात केलेल्या या लग्नात फार जवळच्या नातेवाईक आणि मित्र- मैत्रिणींना निमंत्रण होतं. लग्नानंतर आता चार दिवसांनी सुष्मिताच्या वहिनीचा गृहप्रवेश झाला. या गृहप्रवेशाचा व्हिडिओ समोर आला आहे. यात सुष्मिताची आई सूनेला ओवाळताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये राजीवने मरून रंगाचा कुर्ता घातला आहे. तर चारूने लाल रंगाची कांजीवरम साडी नेसली आहे. व्हिडिओमध्ये कपल एकमेकांसोबत फार सुंदर दिसत आहेत. व्हिडिओमध्ये चारू असोपा जेव्हा गृहप्रवेश करते तेव्हा बंगाली पद्धतीने शुभ कार्यात ज्या पद्धतीने जोरजोरात ओरडतात तशा ओरडताना दिसत आहेत.
राजीवने १६ जूनला गोव्यात डेस्टिनेश वेडिंग केलं. चार दिवस रंगलेल्या या सोहळ्यातील संगीत, साखरपुडा, मेहंदी आणि लग्नाचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. यावेळी सुष्मिताने तिचा प्रियकर रोहमन शॉल आणि तिच्या दोन्ही मुलींनी डान्सही केला.
सुष्मिताने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून काही व्हिडिओ शेअर केले. एका व्हिडिओमध्ये ती साखरपुड्याच्या अंगठ्या सर्वांना दाखवताना दिसते. तर दुसऱ्या व्हिडिओत राजीव आणि चारू यांच्या साखरपुड्याचा व्हिडिओ शेअर केला. तर अजून एका व्हिडिओमध्ये सुष्मिता आपल्या दोन्ही मुली रिने आणि अलीशासोबत पावसात भिजण्याचा आनंद घेत आहे.
चारुच्या कुटुंबियांनी सुष्मिताला लग्नात काही भेटवस्तूही दिल्या. हळदी समारंभात चारूने पिवळ्या रंगाचा लेहंगा घातला होता. त्यावर पांढऱ्या आणि गुलाबी रंगाची ज्वेलरी घातली होती. २८ वर्षीय चारू ही टीव्ही अभिनेत्री असून तिने मेरे अंगने में, ये रिश्ता क्या कहलाता है आणि संगिनी या सिनेमांत काम केलं आहे. ३६ वर्षीय राजीव हा दागिन्यांचा व्यावसायिक आहे. International Day of Yoga: योगा केल्यानं मला खूप ऊर्जा मिळते- शिल्पा शेट्टी