मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /प्रियांकाच्या चुकीमुळे अभिनेत्यास दुखापत अन् झाला रक्तबंबाळ ; अभिनेत्रीला कोसळलं रडू, video viral

प्रियांकाच्या चुकीमुळे अभिनेत्यास दुखापत अन् झाला रक्तबंबाळ ; अभिनेत्रीला कोसळलं रडू, video viral

प्रियांका चोप्राचा (Priyanka Chopra) एक जुना व्हिडिओ (Priyanka Chopra Video) सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तिच्यासोबत अभिनेता मानव कौल (Manav Kaul) दिसत आहे.

प्रियांका चोप्राचा (Priyanka Chopra) एक जुना व्हिडिओ (Priyanka Chopra Video) सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तिच्यासोबत अभिनेता मानव कौल (Manav Kaul) दिसत आहे.

प्रियांका चोप्राचा (Priyanka Chopra) एक जुना व्हिडिओ (Priyanka Chopra Video) सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तिच्यासोबत अभिनेता मानव कौल (Manav Kaul) दिसत आहे.

मुंबई, 02 डिसेंबर : प्रियांका चोप्राचा (Priyanka Chopra) एक जुना व्हिडिओ (Priyanka Chopra Video) सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तिच्यासोबत अभिनेता मानव कौल (Manav Kaul) दिसत आहे. व्हिडिओमध्ये प्रियांका चोप्रा रडताना दिसत आहे. कारण तिच्यामुळे मानव कौलला चुकून दुखापत झाली आहे. खरंतर हा व्हिडिओ अभिनेत्रीच्या 'जय गंगाजल' चित्रपटाच्या शूटवेळचा आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही अभिनेत्री प्रियांका चोप्राला रडताना आणि माफी मागताना पाहू शकता. तर मानव कौल तिला समजावून सांगत आहे की यात तिची काहीच चूक नाही.

प्रियांका चोप्राला कोसळले होते रडू

'जय गंगाजल' हा चित्रपट 2016 मध्ये प्रदर्शित झाला होता. जो 2003 मध्ये आलेल्या 'गंगाजल' चित्रपटाचा सिक्वेल होता. यामध्ये प्रियांका चोप्रा अॅक्शन करताना दिसली होती. जेव्हा प्रियांका चोप्रा एक सीन शूट करत असताना मानव कौलला दुखावले होते. तेव्हा ती रडू लागली होती.

प्रियांकाचा रडण्याचा व्हिडिओ व्हायरल

एका ट्विटर यूजरने दीड वर्षापूर्वी हा व्हिडिओ शेअर केला होता. जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये प्रियांका पोलीस गेटअपमध्ये रडताना आणि माफी मागताना दिसत आहे. तर मानवचा चेहरा रक्ताने माखलेला आहे आणि तो प्रियांकाला शांत होण्यास सांगत आहे.

वाचा: 'मी मेल्यानंतर मीडियाकडे एक तरी..', कुशल बद्रिकेची पोस्ट चर्चेत

तासभरासाठी शूटिंग थांबवण्यात आलं होतं

मानव कौलने एका जुन्या मुलाखतीत या घटनेबद्दल सांगितले होते. प्रियांकाने मानवला जोरदार फटका मारल्याने तासभर शूट थांबवावे लागले. यामुळे प्रियांका खूपच वाईट वाटले होते. मानवला तिची खूप समजूत काढावी लागली होती. तिला शांत करण्यासाठी मानवला खूप प्रयत्न करावे लागले.

वाचा:  प्रियांकाचा नवरा निक जोनस बॉलिवूडमध्ये करू शकतो एन्ट्री; एका गोष्टीची पाहतोय वाट

बॉलीवूड लाइफशी संवाद साधताना मानव कौल म्हणाला होता, 'मी प्रियांकासोबत फाईट सीन शूट करत होतो. प्रियांका चोप्राला मला मारायचे होते. त्यावेळी चुकून तिनं माझ्या गळ्यावर मारले. मी सहजतेने ते घेतले, कारण शूटिंगदरम्यान एखाद्याला चुकून कुठेही दुखापत होऊ शकते.'' प्रियांकाने मानवला पुन्हा विचारले की त्याला दुखापत झाली आहे का? मानवने सांगितले की ती ठीक आहे. परंतु प्रियांका रडू लागली, ज्यामुळे तिला शूटमधून एक तासाचा ब्रेक घ्यावा लागला.

First published:

Tags: Bollywood, Bollywood News, Entertainment, Priyanka chopra