Home /News /entertainment /

'मी मेल्यानंतर मीडियाकडे एक तरी..', कुशल बद्रिकेची पोस्ट चर्चेत

'मी मेल्यानंतर मीडियाकडे एक तरी..', कुशल बद्रिकेची पोस्ट चर्चेत

सोशल मीडियावर पोस्ट लिहित कुशलने अवधूत गुप्तेचे आभार मानले आहेत. सध्या कुशलची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे.

  मुंबई, 1 डिसेंबर- सध्या सगळीकडे पांडू चित्रपटातील दादा परत या ना हसवा ना… या गाण्याची चर्चा आहे. या चित्रपटात भाऊ कदम, कुशल बद्रिके, सोनाली कुलकर्णी हे कलाकार महत्वाची भूमिका साकारताना दिसणार आहेत. महत्वाचं म्हणजे चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच दादा परत या ना हसवा ना… हे चित्रपटातलं गाणं तुफान हिट ठरलेलं पाहायला मिळत आहे. अवधूत गुप्तेने हे गाणं संगीतबद्ध केलं असून अवधूत आणि आदर्श शिंदे यांनी ते गायलं आहे. हे गाणं आपल्या वाट्याला आल्यानंतर कुशल बद्रिकेने (kushal badrike) आपली इच्छा पूर्ण झाल्याचे म्हटले आहे. सोशल मीडियावर पोस्ट लिहित कुशलने अवधूत गुप्तेचे आभार मानले आहेत. सध्या कुशलची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. कुशल बद्रिकेने इन्स्टा पोस्ट करत म्हटलं आहे की, मी मेल्यानंतर मिडियाकडे एक तरी गाण असाव वाजवायला ज्यात मी आहे. असं मला कायम वाटायचं , असं एक जबरी गाण दिल्याबद्दल @avadhoot_gupte sir सगळ्यात आधी तुम्हाला लै लै thank you.मित्रांनो गाण नक्की बघा ..असं म्हणत कुशलने गाण्याचा व्हिडिओ देखील शेअर केला आहे. 3 डिसेंबर रोजी “पांडू” चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. वाचा : BB15: विश्वसुंदरीसोबत फ्लर्ट करण्याच्या नादात अभिजित बिचुकलेचा झाला मोठा पचका चला हवा येऊ द्या या शोमुळे कुशलला एक वेगळी ओळख निर्माण करता आली. यामुळे तो महाराष्ट्राच्या घराघऱात पोहचला. या शोमध्ये भाऊ कदम, श्रेया बुगडे आणि कुशल ही तिघ सेटवर धमाल करताना दिसतात. यांच्या विनेदी शैलीमुळे लोकांना हासायला भाग पाडतात. या तिघांमध्ये खऱ्या आयुष्यात देखील घट्ट मैत्रि आहे.
  कुशलला बकुळा नामदेव घोटाळे, जत्रा, डावपेच, रंपाट, लूज कंट्रोल, स्लॅमबुक अशा चित्रपटातून त्याला अभिनयाची संधी मिळाली. मात्र प्रथमच तो पांडू चित्रपटातून महत्वाच्या भूमिकेत झळकताना दिसत आहे. या चित्रपटातील दादा परत या ना या एका गाण्यामुळे त्याचे स्वप्न आता सत्यात उतरताना तो पाहत आहे. हे गाण प्रेक्षकांना देखील खूप आवडले आहे.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Entertainment, Marathi entertainment, Zee marathi serial

  पुढील बातम्या