जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / प्रियांकाचा नवरा निक जोनस बॉलिवूडमध्ये करू शकतो एन्ट्री; फक्त एका गोष्टीची पाहतोय वाट

प्रियांकाचा नवरा निक जोनस बॉलिवूडमध्ये करू शकतो एन्ट्री; फक्त एका गोष्टीची पाहतोय वाट

प्रियांकाचा नवरा निक जोनस बॉलिवूडमध्ये करू शकतो एन्ट्री; फक्त एका गोष्टीची पाहतोय वाट

बॉलिवू़ड अभिनेत्री प्रियांका चोप्राचा (Priyanka Chopra) पती निक जोनास(Nick Jonas) आता भारतीय प्रेक्षकांशी चांगालाच परिचित झाला आहे. बॉलिवूड ते हॉलिवूड असा सुंदर प्रवास करणारी प्रियांका रोजच कोणत्या ना कोणत्या कारणावरून चर्चेत असते.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 1 डिसेंबर- बॉलिवू़ड अभिनेत्री प्रियांका चोप्राचा (Priyanka Chopra) पती निक जोनास**(Nick Jonas)** आता भारतीय प्रेक्षकांशी चांगालाच परिचित झाला आहे. बॉलिवूड ते हॉलिवूड असा सुंदर प्रवास करणारी प्रियांका रोजच कोणत्या ना कोणत्या कारणावरून चर्चेत असते. अलीकडे, जेव्हा प्रियांकाने तिच्या नावा पुढचे जोनस हे नाव काढून टाकले तेव्हा निकसोबत घटस्फोट झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. बरं, असं काही नाही हे स्पष्ट झालं, पण कालांतराने दोघांचं प्रेम वाढतच जातं. प्रियांका भारताची आहे, त्यामुळे साहजिकच तिला बॉलिवूड चित्रपट आणि संगीताची आवड आहे, पण निकलाही ते खूप आवडते. इतकंच नाही तर निक चांगली भूमिका मिळाल्यास हिंदी चित्रपटांमध्ये काम करण्यासही तयार आहे. निकला आवडतात बॉलिवूड चित्रपट मीडियाला दिलेल्या मुलाखतीत निक जोनासने भारतीय फिल्म इंडस्ट्रीची प्रशंसा केली आहे . निकला हिंदी चित्रपट आवडतात आणि चांगल्या भूमिकेची ऑफर आल्यास तो बॉलिवूडमध्ये प्रवेश करू शकतो. प्रियांका चोप्राच्या पतीलाही हिंदी गाणी आवडतात.खलीज टाइम्सशी बोलताना निक म्हणाला, ‘माझी पत्नी प्रियांकासोबत राहिल्यानंतर गेल्या काही वर्षांत मला बॉलिवूडबद्दल अधिक माहिती मिळाली आहे. हे सर्व जाणून घेतल्यानंतर मला खूप इंटरेस्टिंग वाटले आणि असे काही तरी करण्यात मला रस असल्याचे त्याने सांगितले. वाचा : दिया मिर्झा दररोज करणार एक लाख दान; यामागचं कारण आहे खास निकला आवडते भारतीय संगीत निक पुढे म्हणाला की, ‘आता बॉलिवूडमध्ये माझे बरेच मित्र झाले आहेत. जे लोक या इंडस्ट्रीत काम करतात त्यांच्यापासून खूप प्रेरणा देखील मिळते. योग्य ऑफर मिळाल्यास, मी ती स्वीकारी शकतो. याशिवाय, निकने हिंदी संगीत अतिशय अप्रतिम असल्याचे सांगितले. जेव्हा मी भारतात होतो आणि माझ्या लग्नाच्या वेळीही मी भरपूर भारतीय संगीत ऐकले असल्याचे त्याने सांगितले. डान्स करण्यासाठी हे सर्वोत्तम संगीत आहे. याशिवाय आम्ही आमच्या घरातील पार्ट्यांमध्येही भारतीय संगीताचा आस्वाद घेत असल्याचे त्याने सांगितले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात