जेव्हा ओक्साबोक्शी रडत प्रियांका चोप्रा म्हणाली होती, 'मला माफ करा'

जेव्हा ओक्साबोक्शी रडत प्रियांका चोप्रा म्हणाली होती, 'मला माफ करा'

मागच्या काही दिवसांपासून आगामी सिनेमा 'द स्काय इज पिंक'मुळे प्रियांका सतत चर्चेत आहे.

  • Share this:

मुंबई, 18 सप्टेंबर : बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा आता ग्लोबल मीडिया स्टार झाली आहे. मागच्या काही दिवसांपासून आगामी सिनेमा 'द स्काय इज पिंक'मुळे प्रियांका सतत चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला. ज्याला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता प्रियांका सध्या या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बीझी आहे. मात्र नुकतीच या सिनेमाबाबत एक अशी बाब समोर आली आहे. जी ऐकल्यावर कोणालाही धक्का बसेल.

प्रियांका चोप्रानं सलमान खानच्या भारत सिनेमाला नकार देत द स्काय इज पिंकला प्राधान्य दिलं. लग्नाच्या 4 दिवस अगोदर पर्यंत प्रियांका या सिनेमाचं शूट करत होती. मात्र या सिनेमातील एक सीन शूट करताना प्रियांका अक्षरशः ओक्शीबोक्शी रडली होती. हा सीन संपल्यावर जेव्हा दिग्दर्शकानं कट म्हटलं त्यानंतर तिचे अश्रू थांबत नव्हते. ती रडत राहिली.

जावेद अख्तर नाही, 'हा' बॉलिवूडचा अभिनेता हाेता शबाना आझमींचा पहिला क्रश

द स्काय इज पिंकच्या शूटिंग दरम्यानचा हा प्रसंग सिनेमाच्या दिग्दर्शिका सोनाली बोस यांनी एका प्रमोशनमध्ये सांगितला. सोनाली म्हणाल्या, या सिनेमाच्या एका सीनच्या वेळी प्रियांका खूपच इमोशनल झाली होती. अचानक ती ओक्शीबोक्शी रडू लागली. हा सीन शूट झाल्यानंतरही तिचं रडणं थांबत नव्हतं. त्यानंतर ती सतत एकच सांगत होती, मला माफ करा मला माफ करा... ती म्हणाली, आता मला समजलं की एका मुलाला गमावण्याचं दुःख काय असतं. मला इश्लू बाबत खूप वाईट वाटतं आणि त्यावेळी मी प्रियांकाला संभाळण्याचा प्रयत्न करत होते.

गुरू-राधिकानं स्वीकारलं समर-सुमीचं चॅलेंज, कलाकारांची अशी 'ही' लगीनघाई

16 वर्षीय मुलाचा मृत्यू

इश्लू हा सोनाली बोस यांचा मुलगा ईशान आहे. ईशानचं वयाच्या 16 व्या वर्षी इलेक्ट्रिक रेजरमधून करंट लागल्यानं निधन झालं. ‘द स्काय इज पिंक’ या सिनेमातून जवळपास 3 वर्षांनी प्रियांका बॉलिवूडमध्ये कमबॅक करत आहे. या सिनेमाच्या रॅपअप पार्टीमध्ये बोलताना प्रियांका म्हणाली होती, ‘मला अनेकांनी मी ‘भारत’ सोडून ‘द स्काय इज पिंक’ का निवडला असा प्रश्न विचारला. पण मला ‘भारत’ सारख्या ‘डान्स-साँग सिनेमा’ पेक्षा ‘द स्काय इज पिंक’ची कथा जास्त आवडली. मी या सिनेमात 18 वर्षीय मुलीच्या आईची भूमिका साकारत आहे. पण हा सिनेमा मी फक्त दिग्दर्शक सोनाली बोससाठी केला.

भन्साळी करतायत मोदींवर नव्या सिनेमाची निर्मिती, चर्चा मात्र पोस्टरवरच्या हिरोची!

सोनाली बोस यांनी दिग्दर्शित केलेला 'द स्काय इज पिंक' हा सिनेमा 18 वर्षीय मोटिव्हेशनल स्पीकर आयेशी चौधरीच्या जीवनावर आधारित आहे. आयशाला इम्‍यून डेफिशियंसी डिस्‍आर्डर नावाचा आजार होता. ज्यामुळे 2015 मध्ये तिचा मृत्यू झाला.'द स्काय इज पिंक' या सिनेमात फरहान अख्तर, प्रियांका चोप्रा यांच्यासह, झायरा वसीम आणि रोहित सराफ यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा सिनेमा येत्या 11 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. या सिनेमाची निर्मीती रॉनी स्क्रुवाला आणि सिद्धार्थ रॉय कपूर यांनी केली आहे.

==================================================================

SPECIAL REPORT: नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशानंतर युती तुटणार का?

Published by: Megha Jethe
First published: September 18, 2019, 11:59 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading