जावेद अख्तर नाही, 'हा' बॉलिवूडचा अभिनेता हाेता शबाना आझमींचा पहिला क्रश

जावेद अख्तर नाही, 'हा' बॉलिवूडचा अभिनेता हाेता शबाना आझमींचा पहिला क्रश

अभिनेत्री शबाना आझमी नेहमीच त्यांच्या दमदार अभिनयासाठी ओळखल्या जातात. बॉलिवूडच्या यशस्वी अभिनेत्रींमध्ये शबाना यांचं नाव घेतलं जातं.

  • Share this:

मुंबई, 18 सप्टेंबर : बॉलिवूडमधील एकेकाळची आघाडीच्या अभिनेत्री शबाना आझमी नेहमीच त्यांच्या दमदार अभिनयासाठी ओळखल्या जातात. शबाना यांचा जन्म 18 सप्टेंबर 1950 ला झाला. आज त्या 69वा वाढदिवस साजरा करत आहेत. कमर्शिअल आणि आर्ट फिल्ममध्ये आपल्या दमदार अभिनयाद्वारे लोकप्रियता मिळवणाऱ्या शबाना यांनी बॉलिवूडमध्येही अनेक हिट सिनेमे दिले आहेत. बॉलिवूडच्या यशस्वी अभिनेत्रींमध्ये शबाना यांचं नाव घेतलं जातं. त्याच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात तिच्या जीवनातील काही रंजक गोष्टी...

शेखर कपूर यांच्याशी रिलेशनशिप

खूप कमी लोकांना माहित आहे की, गीतकार जावेद अख्तर यांच्याशी लग्न करण्यापूर्वी शबाना फिल्म मेकर शेखर लकपूर यांच्याशी रिलेशनशिपमध्ये होत्या. मात्र त्यांचं हे नातं फार काळ टिकू शकलं नाही आणि नंतर शबाना यांनी जावेद अख्तर यांच्याशी लग्न केलं.

भन्साळी करतायत मोदींवर नव्या सिनेमाची निर्मिती, चर्चा मात्र पोस्टरवरच्या हिरोची!

शबाना या प्रसिद्ध शायर कैफी आझमी यांची मुलगी होय. बालपनापासूनच शबाना यांना थिएटर बद्दल आकर्षण होतं. त्यांची आई शौकत आझमी थिएटर आर्टिस्ट होती. त्यामुळे लहान असताना पासूनच शबाना यांची अभिनयातील रुची वाढत गेली.

अंकुर मधून केला बॉलिवूड डेब्यू

शबाना आझमी यांनी 1974मध्ये रिलीज झालेल्या 'अंकुर' सिनेमातून बॉलिवूड डेब्यू केला. या सिनेमात त्यांनी नोकरानीची भूमिका साकारली होती. हा सिनेमा हिट झाला आणि या सिनेमासाठी शबाना यांनी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.

नेहा धुपियाशी लग्नानंतर एक्स गर्लफ्रेंडविषयी अंगद बेदी म्हणतो...

शशी कपूर यांची चाहती

शबाना आझमी शशी कपूर यांच्या खूप मोठ्या चाहत्या होत्या. किंवा असंही म्हणू शकतो कि त्यांना शशी कपूर यांच्यावर क्रश होता. त्यानंतर त्यांनी शसी कपूर यांच्यासोबत 1976मध्ये 'फकीरा'मध्ये काम केलं.

जया बच्चन आहेत प्रेरणा

जया बच्चन या शबाना आझमी यांच्या प्रेरणा स्थान होत्या. जया यांच्यापासून प्रेरणा घेत शबाना यांनी बॉलिवूडमध्ये करि्र करण्याचा निर्णय घेतला होता. शबाना यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कडून तयार करण्यात आलेल्या एका सिनेमात जया भादुरी यांनी पाहिल्यावर शबाना यांनी पुणे इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतला.

धक्कादायक! रिहर्सलच्या नावाखाली दिग्दर्शकानं केली होती ‘ही’ मागणी

चार वेळा जिंकला फिल्मफेअर

शबाना यांना त्यांच्या दमदार अभिनयासाठी एक-दोन वेळा नाही तर तब्बल चार वेळा फिल्म फेअर पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. याशिवाय अभिनय क्षेत्रातील इतर अनेक पुरस्कारांनी शबाना यांना सन्मानित करण्यात आलं आहे. तसेच 1988 मध्ये त्यांना भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार देण्यात आला.

========================================================

SPECIAL REPORT: नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशानंतर युती तुटणार का?

Published by: Megha Jethe
First published: September 18, 2019, 9:50 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading