भन्साळी करतायत मोदींवर नव्या सिनेमाची निर्मिती, चर्चा मात्र पोस्टरवरच्या नव्या हिरोची!

भन्साळी करतायत मोदींवर नव्या सिनेमाची निर्मिती, चर्चा मात्र पोस्टरवरच्या नव्या हिरोची!

सिनेमात नरेंद्र मोदींची भूमिका कोण साकारणार हे मात्र स्पष्ट करण्यात आलेलं नाही. पोस्टरवर दिसणारा हा चेहरा कोणाचा याविषयी मात्र सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे.

  • Share this:

मुंबई, 17 सप्टेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आलेल्या बायोपिकनंतर बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी सुद्ध नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर एक सिनेमा तयार करत आहेत. या सिनेमाचं पहिलं पोस्टर आज नरेंद्र मोदीच्या वाढदिवसाला म्हणजेच 17 सप्टेंबरला रिलीज झालं. 'मन बैरागी' नावाचा हा सिनेमा पंतप्रधान मोदींच्या जीवनातील माहित नसलेल्या पैलूंवर आधारित असणार आहे.

अभिनेता अक्षय कुमारनं या सिनेमाचं पोस्टर त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केलं. या पोस्टरवर मन बैरागी जब मै मुजसे मिला अशी टॅगलाइन पाहायला मिळत आहे. या सिनेमात नरेंद्र मोदींची भूमिका कोण साकारणार हे मात्र स्पष्ट करण्यात आलेलं नाही. पण हा सिनेमा हिवाळ्यापर्यंत प्रेक्षाकांच्या भेटीला येईल असं पोस्टरवर दिसत आहे. पण रिलीज झालेल्या या पोस्टरवर दिसणारा हा चेहरा कोणाचा याविषयी मात्र सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे.

धक्कादायक! रिहर्सलच्या नावाखाली दिग्दर्शकानं केली होती ‘ही’ मागणी

Loading...

 

View this post on Instagram

 

Kitabe to bohot si padhi hongi tumne.. kabhi kisi ka chehra padha hai kya?

A post shared by Abhay Verma. (@verma.abhay_) on

'मन बैरागी'च्या पोस्टरवर दिसणारा हा चेहरा आहे अभिनेता अभय वर्माचा. अभय मोदींच्या या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे.  अभयनं त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक व्हिडीओ शेअर करत याबाबतच्या वृत्ताला पुष्टी दिली. अभयनं याआधी एका म्यूझिक साँगमध्ये काम केलं आहे. 'नैना दा क्या कसूर' या सिनेमातील हे गाणं आहे. याशिवाय त्यानं काही जाहीरातींमध्येही काम केलं आहे.

प्रियांका चोप्राच्या आधी 'ही' आहेत निक जोनासची गाजलेली अफेअर्स

 

View this post on Instagram

 

Cheers to iphone filters

A post shared by Abhay Verma. (@verma.abhay_) on

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जीवनावर आधारित असेलेल्या या सिनेमाची निर्मिती दिग्दर्शक संजय लीला भन्साळी आणि महावीर जैन मिळून करत आहेत. या सिनेमाची कथा संजय त्रिपाठी यांनी लिहिली आहे. तर दिग्दर्शन संजय लीला भन्साळी करत आहेत. पंतप्रधान मोदींच्या आयुष्यातील एका निर्णयक क्षणावर आधारित हा सिनेमा असून पूर्ण गांभीर्य आणि प्रामाणिकपणे या सिनेमाची निर्मिती केली जात आहे.

...अन् रणवीर सिंहची पत्नी असल्याचं सांगायला विसरली दीपिका पदुकोण

 

View this post on Instagram

 

A post shared by Abhay Verma. (@verma.abhay_) on

मोदींवर तयार होत असलेल्या या सिनेमाविषयी भन्साळी सांगातात, या कथेतील जगाला प्रभावित करणाऱ्या संदेशानं मला प्रेरित केलं आहे. या सिनेमासाठी आम्ही बरंच संशोधनही केलं आहे. पंतप्रधान मोदींच्या तरुण वयात आलेल्या टर्निंग पॉइन्टनं मला खूपच इम्प्रेस केलं आहे. ही कथा वाचल्यावर मला वाटलं की हे अद्याप कोणालाच माहित नाही आणि ते सर्वांपर्यंत पोहोचलं पाहिजे.

ही एक ह्यूमन इंट्रेस्ट स्टोरी

या सिनेमाच्या कथेचे लेखक संजय त्रिपाठी यांच्या मते, हा सिनेमा प्रत्येक भारतीयाच्या मनाला भावेल. माझ्यासाठी ही एक ह्यूमन इंट्रेस्ट स्टोरी आहे. ही एका माणसानं स्वतःला शोधण्याची कथा आहे. जो पुढे जात राहिला आणि देशाचा सर्वात मजबूत नेता झाला.

=============================================================

VIDEO: पंतप्रधान मोदींच्या हस्ते फुलपाखरू उद्यानाचं उद्घाटन

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 17, 2019 05:21 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...