मुंबई, 17 सप्टेंबर : झी मराठीवर सनई चौघडे वाजायला लागलेत. मिसेस मुख्यमंत्री मालिकेत समर आणि सुमीचं लग्न येत्या रविवारी आहे. त्यानिमित्तानं त्यांचं प्रीवेडिंग शूटही झालं. इन्स्टावर त्याचे फोटोज टाकलेत. पण समर आणि सुमीनं इतर कलाकारांना एक चॅलेंज दिलंय. त्यांच्या लग्नातले फोटो शेअर करायचे. अनेकांनी ते स्वीकारलंय.
रात्रीस खेळ चाले मालिकेतल्या दत्तानं म्हणजे सुहास शिरसाठनं आपल्या लग्नातला फोटो शेअर केलाय.
संभाजी मालिकेतल्या सोयराबाईची भूमिका करणाऱ्या स्नेहलतानंही वेडिंग डायरी उघडलीय.
माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतल्या गुरू, राधिका, सौमित्र यांनी आपल्या खऱ्या आयुष्यातल्या जोडीदारांचे फोटो शेअर केलेत.
समर-सुमीचं लग्न 22 सप्टेंबरला म्हणजे रविवारी दाखवलं जाणार आहे. हे वेडिंग डायरी चॅलेंज म्हणजे प्रमोशनचा अनोखा फंडा आहे. VIDEO: पंतप्रधान मोदींच्या हस्ते फुलपाखरू उद्यानाचं उद्घाटन