मुंबई, 18 जुलै : बॉलिवूड पासून हॉलिवूड पर्यंत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री म्हणजे प्रियांका चोप्रा. कुठलंही फॅमिली बॅकग्राउंड नसताना प्रियांकाने फिल्मी जगतात पाऊल ठेवलं. आपल्या सौंदर्यासोबतच अभिनयाने तिनं सगळ्यांचीच मनं जिंकली. प्रियांका चोप्रा आज 18 जुलै रोजी तिचा 41 वा वाढदिवस साजरा करत आहे. फक्त भारतातच नाही तर विदेशात देखील प्रियांकाचं फॅन फॉलोईंग जबरदस्त आहे. पण प्रियांका चोप्राने एक अशी गोष्ट केलेली आहे ज्यामुळे तिचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेलं आहे. काय आहे हे प्रकरण जाणून घ्या. झारखंड मधील जमशेदपूर येथे जन्मलेल्या प्रियांका चोप्राने 2000 साली ‘मिस वर्ल्ड’चा किताब पटकावला होता. पण तिथपर्यंत पोहोचणं देखील तिच्यासाठी सोप्पी गोष्ट नव्हती. तिला वर्णभेदाचा प्रचंड सामना करावा लागला. पण आपल्या अभिनयाचा ठसा उमटवत प्रियांकाने बॉलिवूडमध्येही दमदार कामगिरी केली. प्रियांकाला आजवर अभिनय कारकिर्दीत दोन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, 5 फिल्मफेअर पुरस्कार यासोबतच पद्मश्री पुरस्काराने गौरवलं गेलं आहे. याशिवाय तिने जगातील 100 प्रभावशाली व्यक्ती आणि जगातील 100 सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीत आपले स्थान निर्माण केले आहे.
सध्या प्रियांका हॉलिवूड चित्रपट आणि वेब सीरिजच्या दुनियेत खूप सक्रिय आहे. एकीकडे प्रियांकावर मुलगी आणि कुटुंब सांभाळण्याची जबाबदारी आहे, तर ती तिचं व्यावसायिक आयुष्यही उत्तम प्रकारे हाताळत आहे. Kriti Sanon : मीना कुमारींची भूमिका क्रितीला भोवणार; अभिनेत्रीवर कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता 2009 मध्ये प्रियांका चोप्राचा ‘व्हॉट्स युअर राशी’ हा चित्रपट आला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन आशुतोष गोवारीकर यांनी केले होते. ‘व्हॉट्स युअर राशी’ या चित्रपटामुळे प्रियांकाच्या नावाचा गिनीज बुकमध्ये समावेश करण्यात आला होता. खरं तर, या चित्रपटात प्रियांकाने एकट्याने 12 वेगवेगळ्या राशी असलेल्या 12 मुलींची भूमिका साकारली आहे. प्रियंका ही पहिली चित्रपट अभिनेत्री होती जिने एकाच चित्रपटात 12 वेगवेगळ्या भूमिका केल्या. या चित्रपटाच्या निर्मात्या सुनीता गोवारीकर यांनी प्रियांकाचे नाव गिनीज अधिकाऱ्यांना पाठवले होते. त्यानंतर अभिनेत्रीच्या नावे हा विक्रम नोंदवण्यात आला होता. डेटा सायन्स फर्म पॅरोट अॅनालिटिक्सनुसार, 2022-23 मध्ये, प्रियांकाला जगातील सर्वात मागणी असलेली अभिनेत्री म्हणून वर्णन केले गेले आहे. या काळात प्रियांकाची जागतिक मागणी जगभरातील अभिनेत्रींपेक्षा 33.6 पट अधिक असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे प्रियांका जागतिक पातळीवर भारताचं नाव गाजवत आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही.
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, प्रियांका चोप्रा बॉलिवूड चित्रपटांव्यतिरिक्त अनेक हॉलीवूड चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये देखील दिसली आहे. प्रियांकाने क्वांटिको ते सुपरसोल आणि इट्स माय सिटी, सिटाडेल यासारख्या अनेक टीव्ही शो मध्ये काम केलं आहे.