मुंबई, 18 जुलै : अभिनेत्री आणि आता निर्माती झालेली अभिनेत्री क्रिती सॅनन सध्या चर्चेत आहे. अभिनेत्रीचे मागील दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले. यामध्ये आदिपुरुषची सर्वात जास्त चर्चा झाली. क्रितीचं सीता मातेचं रूप प्रेक्षकांना काही भावलं नाही. त्यानंतर क्रिती अजून एका बायोपिकमध्ये दिसणार असल्याची चर्चा होती. बॉलिवूडची ट्रॅजिडी क्वीन मीना कुमारीवर लवकरच चित्रपट येणार असून त्यात क्रिती मीनाची भूमिका साकारणार असल्याची माहिती आहे. तर प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांचं दिग्दर्शन करणार आहे. मात्र आता घोषणा होताच चित्रपटाविषयी वाद निर्माण झाला आहे. प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा मीना कुमारींवर बायोपिक काढणार असून त्यात मुख्य भूमिकेत क्रिती सॅनन दिसणार असल्याची बातमी समोर आली होती. दिवंगत ज्येष्ठ अभिनेत्री मीना कुमारी यांच्या कुटुंबियांना ही बातमी फारशी पटलेली नाही. मीना कुमारी यांचे दिवंगत पती-चित्रपट निर्माते कमाल अमरोही यांचा मुलगा ताजदार अमरोही याने बायोपिक बनवण्यावर आक्षेप घेतला आहे. तसंच क्रितीवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचं देखील सांगितलं आहे.
ताजदार अमरोही यांनी या चित्रपटाविषयी संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, ‘या इंडस्ट्रीतील काही लोक चोरटे झाले आहेत. त्यांना माझ्या घरात आणि क्षेत्रात पाऊल ठेवण्याचा अधिकार नाही.’ ना दंगल ना पठाण ‘हा’ चित्रपट ठरेल ऑल टाइम ब्लॉकबस्टर; रिलीजपूर्वीच कमावणार 800 कोटी! ताजदार पुढे म्हणाले, ‘मीना कुमारी माझी आई आणि कमाल अमरोही माझे वडील होते. तुम्ही तुमच्या घराबद्दल आणि पालकांबद्दल चित्रपट बनवाल का? ते माझ्या पालकांबद्दल जे काही दाखवतील हे निश्चितच खोटं असणार आहे.’ ‘कोईमोई’शी बोलताना ताजदार पुढे म्हणाले, ‘बाबा कमाल अमरोही यांचे २९ वर्षांपूर्वी निधन झाले आणि छोटी अम्मी मीना कुमारी यांचे पन्नास वर्षांपूर्वी निधन झाले. पण लोकांच्या मनात ते आजही जिवंत आहेत. मी म्हणेन की छोटी अम्मीचे सर्वात यशस्वी चित्रपट तिने बाबांसोबत लग्न केल्यानंतर आले. लग्नापूर्वी तिने फक्त पौराणिक कथांमध्ये काम केले होते. कमाल अमरोही यांच्यामुळेच तिची कारकीर्द यशस्वी झाली. लग्नासाठी बाबांनी छोटी अम्मीला घरातून दूर नेले होते असे मानले जाते. बाबांच्या घरी धाकटी आई आली होती. मी तुम्हाला सांगतो की ते स्पर्श न करता प्रेमात पडले. त्या काळात चित्रपटसृष्टीतील रसिक स्टुडिओच्या अंधाऱ्या कोपऱ्यात भेटायचे. माझे आईवडील नाही. फोनवरून त्यांचे प्रेम फुलले. त्याचा आवाज इतका गोड होता की ती त्यांच्या प्रेमात पडली.’ असा खुलासा ताजदार यांनी केला आहे. बायोपिकवरील कायदेशीर कारवाईबाबत बोलताना ताजदार पुढे म्हणाले, ‘माझे वकील जे सांगतील ते मी मानेन. त्यांना थांबायला सांगितले. मी आणि माझी बहीण रश्कासर दोघेही त्यांच्यावर गुन्हा दाखल करू.’ असं ते म्हणाले आहेत.