मुंबई, 1 नोव्हेंबर : प्रियांका चोप्रा सध्या हॉलिवूड आणि बॉलिवूडच्या प्रोजेक्ट्समध्ये बीझी आहे. सिनेमांपासून ते डिजिटल प्लाटफॉर्मपर्यंत प्रियांकाकडे बरेच प्रोजेक्ट आहेत. तर तिचा पती निक जोनस सध्या त्यांच्या कॉन्सर्टमध्ये बीझी आहे. निक आणि प्रियांकाच्या लग्नाला लवकरच 1 वर्ष पूर्ण होईल. पण प्रियांका हे लग्न वाचवण्यासाठी काही नियम पाळत आहे. एवढंच नाही तर निक आणि प्रियांका दोघंही हे नियम कटाक्षानं पाळण्याचा प्रयत्न करतात. काही दिवसांपूर्वी हिंदुस्तान टाइम्सशी तिच्या आणि निकच्या बीझी शेड्यूल आणि त्यांच्या लग्नाविषयी बोलताना प्रियांका म्हणाली, हे खूप कठीण आहे. पण मी खूप खूश आहे की, माझं लग्न अशा व्यक्तीशी झालं जो माझ्या महत्त्वाकांक्षांना समजतो. आमच्या दोघांसाठीही आमचं प्रोफोशल लाइफ खूप महत्त्वाचं आहे. आम्ही दोघंही अशा बॅकग्राउंडमधून आलोय. जिथे आम्हाला हे करिअर आयतं मिळालेलं नाही तर आम्हाला ते तयार करावं लागलं. त्यासाठी 2 दशकांपेक्षा जास्त वेळ आम्ही त्यासाठी मेहनत घेतली आहे. त्यामुळे आम्हाला माहित आहे की त्यासाठी आम्हाला काय करावं लागलं आहे आणि म्हणूनच आम्ही एकमेकांना पूर्ण पाठिंबा देतो. अर्जुनसोबत क्लिनिकमध्ये पोहोचली मलायका अरोरा, सोशल मीडियावर VIDEO VIRAL
आपल्या बीझी शेड्यूलमध्ये लग्न वाचवण्यासाठी प्रियांका आणि निक एक नियम कटाक्षानं पाळतात. प्रियांका म्हणाली, निक आणि मी 2-3 आठवड्यांपेक्षा जास्त काळ एकमेकांपासून दूर राहत नाही. आम्ही दोघंही जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असलो तरीही एकमेकांच्या संपर्कात असतो. प्रत्येक वेळी व्हिडीओ कॉल करतो. हे खूप गरजेचं आहे की, तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला तुमच्या आयुष्याशी जोडून ठेवण्याचा प्रयत्न करता. …म्हणून जॅकी श्रॉफनं अनिल कुमारच्या 17 वेळा कानशीलात लगावली!
प्रियांका आणि निकची ओळख 2017 च्या मेट गाला इव्हेंटमध्ये झाली होती. त्यानंतर 1 वर्षं एकमेकांना डेट केल्यानंतर हे दोघं डिसेंबर 2018 ला जोधपुरच्या उम्मेद भवन पॅलेजमध्ये लग्न गाठ बांधली. ‘ती अजूनही माझ्या कवेत आहे’, विवेकच्या वक्तव्यानंतर सलमानने दिली होती धमकी ============================================================================== VIDEO : परतीच्या पावसानं तोंडचा घासही हिरावला, लाखोंची द्राक्ष बाग उद्ध्वस्त