...म्हणून जॅकी श्रॉफनं अनिल कुमारच्या 17 वेळा कानशीलात लगावली!

...म्हणून जॅकी श्रॉफनं अनिल कुमारच्या 17 वेळा कानशीलात लगावली!

‘परिंदा’ सिनेमाच्या रिलीजला आज 30 वर्षं झाली यावेळी अभिनेता जॅकी श्रॉफ यांनी या सिनेमाच्या शूटिंग दरम्यानच्या काही आठवणी शेअर केल्या.

  • Share this:

मुंबई, 1 नोव्हेंबर : बॉलिवूडचा क्लासिक सिनेमा ‘परिंदा’च्या रिलीजला आज 30 वर्षं झाली. विधु चोप्रा लिखित आणि दिग्दर्शित या सिनेमात अनिल कपूर, जॅकी श्रॉफ, नाना पाटेकर आणि माधुरी दीक्षित यांच्या प्रमुख भूमिका होत्या. हा एक क्राइम-ड्रामा होता. हा सिनेमा 1989 मध्ये रिलीज झाला होता. या सिनेमाला 30 वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्तानं विधु चोप्रा फिल्म यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यावर बॉलिवूडच्या सर्वात सुपरहिट सिनेमाच्या अनेक आठवणी जाग्या झाल्या.

KBC च्या इतिहासात पहिल्यांदाच ‘कम्प्यूटर जीं’वर उठला सवाल, वाचा नक्की काय झालं

अभिनेता जॅकी श्रॉफ यांनी या सिनेमाच्या शूटिंग दरम्यानच्या काही आठवणी शेअर केल्या. त्यांनी सांगितलं की, या सिनेमाच्या शूटिंग दरम्यान त्यांनी आपल्या मोठ्या भावाच्या कानाखाली मारली होती. या सिनेमात एक सीन होता ज्यात जॅकी श्रॉफ यांना अनिल कपूर यांच्या कानाखाली मारायचं होतं. खरं तर हा सीन पहिल्याच शॉटमध्ये परफेक्ट शूट झाला होता मात्र अनिल कपूर यांना आणखी एक शॉट घ्यावासा वाटला आणि असं करता करता जॅकी यांनी अनिल कुमार खरोखरच्या 17 वेळा कानशीलात लगावल्या. कारण हवेत मारलेला फटक्याच्या आधारे योग्य रिअ‍ॅक्शन देता येत नाही.

अभिनेता अक्षय कुमारचं मन जिंकणारं 'हे' आहे झोपडीत राहणारं श्रीमंत कुटुंब

विधु विनोद चोप्रा फिल्म यांच्या ऑफिशिअल ट्विटर हॅन्डल वरुन नेहमीच त्यांच्या जुन्या सिनेमांच्या आठवणी जागवल्या जातात. त्यांचा आगामी सिनेमा शिकारा 2019 मध्ये रिलीजसाठी तयार आहे.

पुन्हा #MeToo, अन्नू मलिकवर या गायिकेनं केला लैंगिक गैरवर्तनाचा आरोप

=======================================================================

VIDEO : परतीच्या पावसानं तोंडचा घासही हिरावला, लाखोंची द्राक्ष बाग उद्ध्वस्त

First Published: Nov 1, 2019 12:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading