बॉलिवूडच्या गाण्यावर निक जोनसचे ठुमके! प्रियांकालाही आवरलं नाही हसू , VIDEO व्हायरल

बॉलिवूडच्या गाण्यावर निक जोनसचे ठुमके! प्रियांकालाही आवरलं नाही हसू , VIDEO व्हायरल

सध्या इन्स्टाग्रामवर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये प्रियांका चोप्रा आणि निक जोनस बॉलिवूडमधील गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. निकचे ठुमके पाहून प्रियांकालाही यावेळी हसू आवरलं नाही.

  • Share this:

मुंबई, 30 मे : कोरोना व्हायरस लॉकडाऊमुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून बॉलिवूड कलाकार त्यांच्या चाहत्यांबरोबर संवाद साधत असतात. या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ते फॅन्सशी जोडले राहण्याचा प्रयत्न करतात. त्याचप्रमाणे सध्या काही कलाकार त्यांचे थ्रोबॅक (Throwback) व्हिडीओ पोस्ट करत आहेत किंवा त्यांचे जुने व्हिडीओ काही इन्साग्राम पेजवरून व्हायरल होत आहे. आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटी कपल असणाऱ्या प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) आणि निक जोनस (Nick Jonas) चा असाच एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये निक आणि प्रियांका भारतीय गाण्यावर डान्स करताना दिसतात. भारतीय संगीतावर निकचे ठुमके पाहून प्रियांकालाही हसू आवरत नाही.

(हे वाचा-167 महिलांना एअरलिफ्ट करत सोनू सूदची मोठी मदत, कोचीहून ओडिशामध्ये पोहोचवलं)

इन्स्टाग्रामवरील Viral Bhayani या पेजने त्यांचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये प्रियांका आणि निक मस्ती करताना दिसत आहे. प्रियांकाने पिवळ्या रंगांचा ड्रेस घातला असून निक काळ्या टक्सिडोमध्ये दिसत आहे.

View this post on Instagram

#priyankachopra and #nickjonas drop this cool video to uplift this stage of mind 🔥🔥🔥

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांचा 2018 मध्ये भारतातच विवाह सोहळा पार पडला होता. मोठ्या शाही पद्धतीने दोघांनी लग्न केलं होतं. त्यावेळी देखील दोघांचे अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. निक-प्रियांका बी टाऊनमधील आवडत्या कपलपैकी एक आहे. लग्नानंतर दोघजणं लॉस एंजलिसमध्ये राहतात. प्रियांकाने तीन वर्षानंतर 'स्काय इस द पिंक' या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा एन्ट्री केली होती.

(हे वाचा-इरफानच्या आठवणीत पत्नी सुतापा पुन्हा झाली भावुक, इमोशनल पोस्ट लिहून म्हणाली...)

First published: May 30, 2020, 2:12 PM IST

ताज्या बातम्या