मुंबई, 29 मे : बॉलिवूड अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) सध्या लाखो नागरिकांच्या गळ्यातील ताईत बनला आहे. लॉकडाऊनच्या काळात अडकलेल्या मजुरांची मदत करण्यामध्ये सोनू गेल्या काही दिवसांपासून व्यस्त आहे. त्यांना घरी पोहोचवण्यासाठी सोनू प्रयत्न करत आहे. प्रवासी मजुरांसाठी सोनू सूदने नुकताच एक हेल्पलाइन नंबर (Helpline Number) देखील जारी केला होता. ज्या मजुरांना मदतीची आवश्यकता आहे, ते या हेल्पलाइन नंबरवर संपर्क करू शकतात, असं आवाहन सोनू आणि त्याच्या टीमकडून करण्यात आले होते. याबाबत त्याने ट्विटरवरून माहिती दिली होती. मुंबई आणि परिसरात फसलेल्या अनेक मजुरांना घरी पाठवण्याचे काम सोनू आणि त्याच्या टीमकडून सुरू आहे.
आतापर्यंत सोनू आणि त्याची टीम मजूरांना घरी पोहोचवण्यासाठी बसेसचा वापर करत होती. मात्र आता सोनूने त्याची मदत पुढच्या स्तरावर नेऊन ठेवली आहे. केरळमधील 167 महिलांना त्याने ओडिशामध्ये पोहोचवण्यासाठी एअरलिफ्ट केले आहे. (हे वाचा- सारा अली खानला भिकारी समजून लोकांनी दिली होते पैसे, मजेशीर VIDEO व्हायरल ) केरळच्या एर्नाकुलममध्ये या महिला अडकल्या होत्या. शिलाई आणि एम्ब्रॉडरीचे काम करणाऱ्या या महिलांना कोणकडून तरी मदतीची अपेक्षा होती. ओडिशामध्ये पोहोचण्यासाठी त्यांची धडपड सुरू होती. कारण लॉकडाऊनमुळे त्यांची फॅक्टरी बंद झाल्याने त्यांना त्याठिकाणी थांबून उपयोगाचं नव्हतं. ‘सोशल मीडियाच्या माध्यमातून या महिलांबद्दल आम्हाला समजलं. माझी मैत्रिण नीती गोयल आणि मी त्यांच्यापर्यंत पोहोचलो. त्यानंतर लक्षात आले की विमान मार्गाने घेऊन जाणे हा एकमेव पर्याय आहे’, अशी प्रतिक्रिया सोनू सूदने CNN News18 शी बोलताना दिली. (हे वाचा- अक्षय कुमारचा बहुचर्चित ‘लक्ष्मी बॉम्ब’ देखील OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार ) यानंतर सोनूसमोर आणखी एक मोठी समस्या होती ती म्हणजे देशातील अनेक विमानतळं बंद असण्याची. त्यामुळे त्याने कोची आणि भुवनेश्वरमधील विमानतळे उघडण्याची परवानगी काढली. शुक्रवारी सकाळा सोनूने एक विमान बंगळुरूहून सकाळी 8 वाजता कोचीला पोहोचेल अशी व्यवस्था केली. याठिकाणी 167 महिलांना एअरलिफ्ट करण्यात आले. एअर एशिया विमानाने या महिलांना त्यांच्या घरी पोहोचवण्यात येत आहे. सोनू सूदच्या या अविरत कामामुळे त्याचे सरकार, विविध कलाकार, जनता, सेलिब्रिटी या सर्वांकडूनच कौतुक होत आहे.