मुंबई, 23 जुलै : अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट यांच्या नात्याच्या चर्चा मागच्या बऱ्याच काळापासून बॉलिवूडमध्ये सुरू आहेत. तसेच ही जोडी लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याच्याही चर्चा आहेत. रणवीर आणि दीपिकाप्रमाणेच अलिया आणि रणबीरही इटलीच्या लेक कोमो येथे लग्न करण्याच्या विचारात आहेत असं म्हटलं जात आहे. त्यांच्या लग्नाच्या चर्चा अलियाची आई सोनी राजदान यांनी फेटळल्या असल्या तरीही आलिया-रणबीरच्या लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली असल्याच्याचं म्हटलं जात आहे. Birthday Special : 22 वर्षांचा संसार मोडून अभिनेत्यानं केलं गर्लफ्रेंडशी लग्न आलिया आणि रणबीर ज्या प्रकारे त्यांच्या लग्नाचं वृत्त फेटाळत आहेत त्यावरुन तर हे दोघंही अनुष्का-विराट आणि दीपिका-रणवीर यांच्याप्रमाणेच मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत लग्नाच्या बेडीत अडकण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी आलिया तयारी सुरू झाली असून ‘टाइम्स ऑफ इंडिया’नं दिलेल्या वृत्तानुसार आलियानंही अनुष्का आणि दीपिका प्रमाणेच लग्नाच्या लेहंग्यासाठी बॉलिवूडमधील प्रसिद्ध डिझायनर सब्यसाची मुखर्जीला पसंती दिली आहे. तसेच ‘स्पॉटबॉयई’नं एप्रिल महिन्यातच लग्नाच्या लेहंग्याचं डिझाइन आणि इतर गोष्टी ठरवण्यासाठी डिझायनर सब्यसाचीची भेट घेतली होती. सुश्मिता सेनला KISS करताना दिसला बॉयफ्रेंड रोहमन, Photo Viral
रणबीर आणि आलिया लवकरच अयान मुखर्जीच्या ब्रह्मास्त्र सिनेमात दिसणार आहेत. या दोघांचा एकत्र हा पहिलाच सिनमा आहे. याआधी एका मुलाखतीत आलियानं रणबीर तिचा सेलिब्रिटी क्रश असल्याचं म्हटलं होतं. जेव्हा तिनं रणबीरला पहिल्यांदा पाहिलं होतं त्यावेळी ती फक्त 11 वर्षांची होती. VIDEO : प्रसिद्ध अमेरिकन टेनिसपटूच्या लग्नात बॉलिवूडच्या ‘या’ गाण्यानं धम्माल
अलियानं फिल्मफेअर अवॉर्ड 2019 मध्ये तिनं सर्वांसमोर रणबीरवरील प्रेम व्यक्त केलं होतं. त्यानंतर दिलेल्या एका मुलाखतीत तिनं रणबीरसोबतच्या नात्याविषयी अनेक खुलासे केले होते. ती म्हणाली, ‘रणबीरसोबतचं नातं ही माझ्यासाठी अचिव्हमेंट नाही तर तो माझ्या आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा भाग आहे. याबाबत मी स्वतःला खूप भाग्यशाली समजते.’ रणबीर आणि आलियाचा ब्रह्मास्त्र हा आगामी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात त्यांच्यासोबत अमिताभ बच्चन आणि मौनी रॉय यांच्याही महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत. ============================================================ VIDEO: गायिका वैशाली माडे ‘या’ कारणामुळे पडली बिग बॉसच्या घरातून बाहेर