जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / आधी नवऱ्याचा पाय फ्रँक्चर आता अभिनेत्रीची तब्येत बिघडली; सोडावी लागली मालिका, Video

आधी नवऱ्याचा पाय फ्रँक्चर आता अभिनेत्रीची तब्येत बिघडली; सोडावी लागली मालिका, Video

प्रिया मराठेने सोडली मालिका

प्रिया मराठेने सोडली मालिका

अभिनेत्रीच्या नवऱ्याच्या पायाला काही दिवसांआधी गंभीर दुखापत झाली होती. नवरा बरा होत असताना अभिनेत्रीची तब्येत बिघडली आणि अखेर तिला मालिका सोडावी लागली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 03 जुलै : मालिकेत काम करत असताना कलाकारांना त्यांच्या तब्येतीची काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं असतं. 12-14 तास चालणारं मालिकांचं शुटींग बऱ्याचवेळा कलाकारांच्या आरोग्यावर घातक परिणाम करतं. असंच काहीस झालंय अभिनेत्री प्रिया मराठेबरोबर. अभिनेत्री प्रिया मराठे स्टार प्रवाहवरील तुझेच मी गीत गात आहे या मालिकेत काम करत होती. मोनिका हे पात्र साकारत होती. निगेटिव्ह रोल असला तरी तिनं अल्पावधीत प्रेक्षकांची पसंती मिळवली होती.  रसिक प्रेक्षकांच्या प्रेमामुळे प्रियाने ‘मोनिका’ हे पात्र एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं होतं. पण आता प्रियानं तुझेच मी गीत गात आहे या मालिकेचा निरोप घेतलाय. प्रियाने मालिका सोडली असून व्हिडीओ शेअर करत ही माहिती दिली आहे. मागील वर्षभरापासून प्रिया मराठे तुझेच मी गीत गात आहे या मालिकेत काम करत होती. दरम्यान तिची प्रकृती बिघडल्यानं तिला मालिका सोडावी लागली आहे. मधल्या काळात प्रियाचा नवरा म्हणजेच अभिनेता शंतनु मोघे याच्या पायाला देखील शुटींग दरम्यान गंभीर दुखापत झाली होती. शंतनुच्या पायाला फ्रँक्चर लावण्यात आलं होतं. शंतनु नुकताच बरा झालेला असताना प्रियाची तब्येत बिघडली आहे. हेही वाचा -  Gautami Patil : भर पावसात गौतमीची कातिल अदा; ‘मार्केट जाम’ केलंय म्हणत दणकून नाचली प्रियाने व्हिडीओ शेअर करत मालिका सोडल्याची माहिती दिली ती म्हणाली, “तुझेच मी गीत गात आहे या मालिकेत मी मोनिका कामत हे पात्र साकारत होते.  या पुढे मी ती भुमिका साकारणार नाहीये. अचानक आलेल्या तब्येतीच्या अडचणीमुळे मला ही भुमिका सोडावी लागल आहे.  मोनिका कामत ही भुमिका करताना मला खूप मज्जा येत होती.  तुम्हालाही ही भुमिका खूप आवडत होती. तुम्ही तिच्यावर प्रचंड प्रेमही केलं. पण जो वेळ मी त्यांना वेळ देऊ शकत होते तो वेळ कुठेतरी कमी पडत होता. बाकी कलाकारांच्या अॅडजस्टमेंट, प्रोडक्शन टीम, तसंच तो रोलही फार डिमांडिग होता. या सगळ्याला पुरेसा वेळ देऊ शकत नव्हते म्हणून मी मालिकेतून निरोप घेतेय”.

जाहिरात

प्रेक्षकांना केलं मालिका पाहण्याचं आवाहन प्रिया पुढे म्हणाली,  “मी ही मालिका सोडत असले तरी तुम्ही ही मालिका पाहणं सोडू नका. तुम्ही ही मालिका पाहत राहा. मी माझ्या तब्येतीची काळजी घेणार आहे आणि लवकरच नव्या मालिकेत, नव्या भुमिकेत तुम्हाला भेटायला नक्की येणार आहे.

News18लोकमत
News18लोकमत

तेजस्विनी लोणारी साकारणार मोनिका प्रिया म्हणाली, “तुझेच मी गीत गात आहे मालिकेत आता माझी भुमिका अतिशय उत्तम आणि छान अभिनेत्री तेजस्विनी लोणारी ही करणार आहे. ती ही भुमिका उत्तमरित्या करेन अशी मला खात्री आहे आणि तुम्हा सर्वांना ती नक्की आवडेल”.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात