जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Gautami Patil : भर पावसात गौतमीची कातिल अदा; 'मार्केट जाम' केलंय म्हणत दणकून नाचली

Gautami Patil : भर पावसात गौतमीची कातिल अदा; 'मार्केट जाम' केलंय म्हणत दणकून नाचली

गौतमी पाटीलचा पावसात डान्स

गौतमी पाटीलचा पावसात डान्स

नेहमीप्रमाणे हजारो संख्येनं पब्लिक गौतमीला पाहण्यासाठी तिथे उपस्थित आहे. पण या व्हिडीओची खास गोष्ट मात्र वेगळीच आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई,  03 जुलै : संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या गौतमी पाटील नं तिच्या गाण्याप्रमाणे अख्खा मार्केट जाम करून ठेवलंय. जिथे तिथे फक्त गौतमीचं नाव ऐकायला मिळतंय. आपल्या नाचानं तरूणांपासून म्हाताऱ्यांपर्यंत सगळ्यांना घायाळ करणाऱ्या गौतमीवर संपूर्ण महाराष्ट्र फिदा आहे असं म्हटलं तर खोटं ठरणार नाही. संपूर्ण महाराष्ट्राला खिळवून ठेवणाऱ्या गौतमीची क्रेझ कमी होण्याचं नाव घेत नाहीये. दरम्यान गौतमीचा नवा व्हिडीओ समोर आला आहे ज्यात ती नेहमीप्रमाणेच बेभान होऊन नाचतेय. नेहमीप्रमाणे हजारो संख्येनं पब्लिक गौतमीला पाहण्यासाठी तिथे उपस्थित आहे.  पण या व्हिडीओची खास गोष्ट मात्र वेगळीच आहे. मागील वर्षभरापासून गौतमीनं महाराष्ट्राच्या कानाकोऱ्यात डान्सचे कार्यक्रम केले. कधी बैलाचा बर्थडे तर बायकोचा बर्थ डे तर कधी थेट महिलांनीच गौतमीचा कार्यक्रम आयोजित केलेला पाहायला मिळालं.  गौतमी सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते. तिच्या कार्यक्रमांची माहिती ती देत असते. तसंच कार्यक्रमाचे तिचे धम्माल व्हिडीओ देखील शेअर करत असते. अशाच एका कार्यक्रमाचा व्हिडीओ गौतमीनं शेअर केला आहे. हेही वाचा - प्राजक्ताचं काळुबाई दर्शन! हातात फुलांची परडी अन् भर पावसात मांढर गडावर फोटोशूट

संपूर्ण महाराष्ट्रात दमदार पावसाला सुरूवात झाली आहे. त्यामुळे गौतमीच्या कार्यक्रमांना आता थोडा होल्ड मिळेल असं सर्वांना वाटतं होतं. पण थांबेल ती गौतमी कसली. भर पाऊसातही गौतमीनं दणक्यात तिचा कार्यक्रम केला. गौतमीनं तिच्या नुकत्याच झालेल्या कार्यक्रमाचा व्हिडीओ शेअर केलाय. ज्यात ती तिच्याच गाण्यावर दणकून नाचतेय आणि तिच्या नाचाला साथ देण्यासाठी वरूण राजा देखील तिथे दाखल झाला आहे. भर पावसात गौतमी तितक्याच एनर्जीनं नाचताना दिसतेय.

News18लोकमत
News18लोकमत

गौतमीनं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती ‘अख्ख मार्केट जाम केलंय या गौतमीनं’ या तिच्या नव्या गाण्यावर दणकून नाचताना दिसतेय.  व्हाइट नऊवारी साडी आणि नेहमीची हेअर स्टाइल गौतमीनं केली आहे. यावेळी तिच्या हातात बांगड्या दिसल्या नाही तर डाव्या हातात स्टायलिश घड्याळ घालून गौतमी नाचताना दिसली.  फायर इमोजी पोस्ट करत गौतमीनं व्हिडीओ शेअर केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात