मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /प्रेम चोप्राच्या लग्नाच्या पार्टीत दोघांच्यात झाली बाचाबाची, राज कपूर यांनी राज कुमार यांना म्हटलं खुनी..

प्रेम चोप्राच्या लग्नाच्या पार्टीत दोघांच्यात झाली बाचाबाची, राज कपूर यांनी राज कुमार यांना म्हटलं खुनी..

bollywood stars

bollywood stars

राजकुमार आणि अभिनेते राज कपूर यांची गणना त्याकाळच्या सर्वात देखण्या, प्रतिभावान अभिनेत्यांमध्ये होतं होती. या दोघांचा रूबाब आणि डायलॉग डिलीवरीचा प्रत्येक जण चाहता होता. त्यांचा चाहता वर्ग पहिलाही तितकाच होता आणि विशेष म्हणजे आजही तो टिकून आहे. या दोघांच्या बऱ्याच गोष्टी सेम होत्या पण या दोघांचं मात्र आपसात कधीच जमलं नाही.

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 19 मार्च- बॉलिवूडचे दिवंगत सुपरस्टार्स राजकुमार आणि राज कपूर आज जरी आपल्यात नसले तरी त्यांचे किस्से मात्र आजही तितकेच लोकप्रिय आहेत. हे दोन्ही हे सुपरस्टार्स त्यांच्या अभिनयासाठी तर लोकप्रियचं होते मात्र त्यांच्या रूबाबदार वागणुकीमुळं देखील ते तितकेच चर्चेत असायचे. अभिनय क्षेत्राता पाऊल ठेवण्यापूर्वी राजकुमार सब इन्स्पेक्टर होते. त्यांनी सब इन्स्पेक्टरची (साहाय्यक पोलिस उपनिरिक्षक) नोकरी सोडून 26 व्या वर्षी सिनेमा जगतात पदार्पण केलं. 1952 साली प्रदर्शित झालेला रंगली हारंगली' हा त्यांचा पहिला चित्रपट होता. त्यानंतर त्यांनी 'मदर इंडिया', 'हमराज' आणि 'हीर रांझा' अशा जवळपास 70 चित्रपटांमध्ये काम केले. राज कुमार यांची गणना त्यांच्या काळातील सुपरस्टार्समध्ये केली जाते. राजकुमार यांना अभिनयाचा वारसा नव्हता मात्र राज कपूर यांना अभिनयाचा वारसा त्यांच्या परिवाराकडून मिळाला होता.ते दिवंगत अभिनेते पृथ्वी राज कपूर यांचे चिरंजीव होते. राज कपूर यांचा पहिला चित्रपट 'इन्कलाब' हा होता. हा चित्रपट आला तेव्हा राज कपूर केवळं 11 वर्षांचे होते.

राजकुमार आणि अभिनेते राज कपूर यांची गणना त्याकाळच्या सर्वात देखण्या, प्रतिभावान अभिनेत्यांमध्ये होतं होती. या दोघांचा रूबाब आणि डायलॉग डिलीवरीचा प्रत्येक जण चाहता होता. त्यांचा चाहता वर्ग पहिलाही तितकाच होता आणि विशेष म्हणजे आजही तो टिकून आहे. या दोघांच्या बऱ्याच गोष्टी सेम होत्या पण या दोघांचं मात्र आपसात कधीच जमलं नाही. सिनेमात तर या दोघांचं वैर पाहायला मिळालचं पण खऱ्या आयुष्यातही या दोघाचं वैर काही कमी नव्हतं. प्रेम चोप्रा यांच्या लग्नात एक असाच किस्सा घडला होता. या लग्नाला प्रेम चोप्रा यांनी

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की राजकुमार आणि राज कपूर यांची गणना हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात देखण्या, प्रतिभावान अभिनेत्यांमध्ये होते. त्या दोघांची उंची आणि अभिनय-अभिव्यक्ती, संवादप्रसार पाहून सगळ्यांनाच त्यांचं आकर्षण वाटलं. मात्र, दोघांची भेट झाली नाही. दोघांचे वैर चित्रपटांबरोबरच खऱ्या आयुष्यातही दिसून आले. प्रेम चोप्रा यांनी त्यांच्या लग्नाला त्यांचे साढू राज कपूर ( राज कपूर आणि प्रेम चोप्रा यांची पत्नी,या दोघीं बहिणी आहेत) आणि मित्र राज कुमार यांना आमंत्रण दिलं होतं.

वाचा-बिग बॉसच्या घरातील आपला माणूस जिंकला; शिव ठाकरेने 'या' पुरस्कारावर कोरलं नाव

प्रेम चोप्रा आणि राज कपूर हे नात्यानं साढू आहेत. राज कपूर यांची पत्नी कृष्णा कपूर यांची धाकटी बहीण उमा यांचे लग्न प्रेम चोप्रा यांच्याशी झाले होते. गंमत म्हणजे हे लग्न खुद्द राज कपूर यांनीच केले होते.उमासोबत लग्न झाल्यानंतर प्रेम चोप्रा यांनी बॉलिवूड कलाकारांसाठी एक पार्टी ठेवली होती. या पार्टीत बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकरांनी हजेरी लावली होती. या पार्टीत कपूर परिवार आणि काही बॉलिवूड सेलेब्स पार्टी एन्जॉय करत होते. पार्टीच्या मध्येच राज कपूर आणि राजकपूर यांच्याता वादावादी झाली.

वाचा-30 वर्षानंतर येणार 'माहेरची साडी' चा सिक्वेल? अलका कुबल यांनी अखेर सांगूनच टाकलं

तू एक खुनी आहेस...

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पार्टी रंगात आळी होती. राज कपूर यांनी मद्य घेतलं होतं. त्यांना थोडी जास्तच झाली होती. त्यावेळी त्यांची नजरा राज कुमार यांच्यावर गेली. ते हाळुहाळू त्यांच्यापर्यंत गेले आणि त्यांना म्हणाले की, तू एक खुनी आहेस. पहिल्यांदा राज कुमार यांनी राज कपूर यांच्याकडं दुर्लक्ष केलं. पण राज यांनी पुन्हा तेच केले. त्यावर राजकुमार म्हणाले, "हो, अर्थातच मी खुनी आहे, पण मी तुझ्याकडे काम मागायला कधीच आलो नाही, पण तो तूच आहेस जो आज माझ्याकडे आला आहे. त्याचवेळी प्रेम चोप्रा आणि इतर स्टार्सनी दोघांना शांत करून वेगळं केलं. कसबसं दोघाचं भांडण मिटवलं.

खुनी म्हण्यामागं होतं हे कारण..

राज कुमार अभिनेता होण्यापूर्वी सब इन्स्पेक्टर होते आणि ते मुंबईत काम करत होते. जेव्हा त्यांना चित्रपटाची ऑफर मिळाली तेव्हा त्यांनी सब इन्स्पेक्टरच्या नोकरीचा राजीनामा दिला आणि चित्रपटाची ऑफर स्वीकारली. अशी चर्चा होती की, राजकुमार मुंबई पोलिसात सब इन्स्पेक्टर असताना त्यांचे नाव एका खुनाच्या प्रकरणात समोर आले होते. यानंतर त्यांनी पोलिसाची नोकरी सोडली व चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरूवात केली. राज कपूर यांना ही गोष्ट माहित होती आणि मद्यधुंद अवस्थेत त्यांनी राजकुमार यांना यावरून टोमणे मारले, ज्यामुळे राज कुमार खूप अस्वस्थ झाले होते.

‘मेरा नाम जोकर’ चित्रपट केला होता रिजेक्ट

राज कुमार चित्रपटात आपलं नशीब आजामवत होते तेव्हा दुसरीकडं राज कपूर चित्रपटात काम करतच होते पण सोबत चित्रपट निर्मितीची धुरा देखील सांभलत होते. असं म्हणतात की, राज कपूर ‘मेरा नाम जोकर’ या चित्रपटाची निर्मिती करत होते, तेव्हा हा चित्रपट राज कुमार यांना ऑफर करण्यात आला होता. मात्र हा चित्रपट करण्यास त्यांनी नकार दिला होता.

First published:

Tags: Bollywood News, Entertainment