जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Preity Zinta: प्रीती झिंटाने सांगितलं 'त्या' घटनेमागचं सत्य; अभिनेत्रीच्या समर्थनात उतरले बॉलिवूडचे स्टार्स

Preity Zinta: प्रीती झिंटाने सांगितलं 'त्या' घटनेमागचं सत्य; अभिनेत्रीच्या समर्थनात उतरले बॉलिवूडचे स्टार्स

प्रीती झिंटा

प्रीती झिंटा

मुंबई, 09 एप्रिल : बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओत तिची कृती पाहून नेटकरी तिला ट्रोल करत होते. तिच्यावर सध्या सगळीकडूनच संताप व्यक्त होत होता. या व्हिडिओत ती एका दिव्यांग व्यक्तीला मदत न करता पुढे निघून जाते असं दिसत होतं. यामुळेच तिच्यावर नेटकरी संताप व्यक्त करत होते. आता या प्रकरणावर प्रीती झिंटाने स्पष्टीकरण दिलं आहे. त्या अपंग व्यक्तीला मदत न करण्यामागचं कारण तिने सांगितलं आहे तसेच व्हिडिओत दिसतंय त्यापेक्षा हकीकत वेगळी होती असं देखील तिने सांगितलं आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 09 एप्रिल :  बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओत तिची कृती पाहून नेटकरी तिला ट्रोल करत होते. तिच्यावर सध्या सगळीकडूनच संताप व्यक्त होत होता. या व्हिडिओत ती एका दिव्यांग व्यक्तीला मदत न करता पुढे निघून जाते असं दिसत होतं. यामुळेच तिच्यावर नेटकरी संताप व्यक्त करत होते. आता या प्रकरणावर प्रीती झिंटाने स्पष्टीकरण दिलं आहे. त्या अपंग व्यक्तीला मदत न करण्यामागचं कारण तिने सांगितलं आहे तसेच व्हिडिओत दिसतंय त्यापेक्षा हकीकत वेगळी होती असं देखील तिने सांगितलं आहे. काय घडलं नक्की जाणून घ्या. प्रीती झिंटाने आपले स्पष्टीकरण देताना अपंग व्यक्तीचा व्हिडिओ शेअर केला आहे. एक लांबलचक पोस्ट लिहिण्यासोबतच तिने अजून एका घटनेचा उल्लेख केला आहे. या घटनेबाबत देखील जाहीरपणे आपली व्यथा मांडली आहे. प्रीतीने दोन घटनांचा उल्लेख केला ज्याने तिला खूप हादरवून सोडले. पहिली घटना अशी आहे की एका अज्ञात महिलेने तिच्या मुलीचा फोटो क्लिक करण्याचा प्रयत्न केला आणि  प्रितीच्या लहान मुलीचा बळजबरीने किस घेतला होता. या घटनेवर प्रितीने खंत व्यक्त करत  ‘माझी मुलं म्हणजे कोणत्याही पॅकेज डीलचा भाग नाहीत’, असं म्हणत प्रितीने पापाराझींनाही फटकारलं आहे. प्रियांका आणि करिनाने एकाच अभिनेत्याला केलंय डेट? दोघींच्या ‘त्या’ उत्तरानं करणंही पडला चाट प्रीती झिंटाने व्हीलचेअरवर बसलेल्या व्यक्तीचा उल्लेख करताना सांगितले की, हा माणूस तिला एक वर्षापासून त्रास देत होता. व्हिडिओची सत्यता सांगताना प्रीती म्हणाली की, प्रत्येक वेळी ती त्याला पैसे देते. यावेळी त्यांनी पैसे मागितले असता त्यांनी आज रोख रक्कम नसल्याचे त्या व्यक्तीला सांगितले. यामुळे ती व्यक्ती आक्रमक झाली आणि त्याने गाडीचा दरवाजा ठोठावला. कोणत्याही घटनेवर इतक्या लवकर निकाल देऊ नये, असेही प्रीतीने स्पष्ट केले. प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात.

जाहिरात

प्रितीच्या पोस्टवर हृतिक रोशनने ‘खूप चांगलं केलंस प्रिती’ असं म्हणलं आहे. तर अभिनेता अर्जुन रामपालने पुन्हा असं काही घडल्यास थेट त्याला कॉल करण्याचा सल्ला दिला. ‘पुढच्या वेळी थेट मला कॉल कर. मी त्यांचा चांगला समाचार घेईन.’ अभिनेत्री मलायका अरोराने लिहिलं, ‘हे स्पष्ट आणि ठामपणे तू बोललीस ते बरं झालं.’ अशा कमेंट अभिनेत्यांनी केल्या आहेत.

News18लोकमत
News18लोकमत

बिझनेसमन पती जीन गुडइनफसोबत लग्न केल्यानंतर लॉस एंजेलिसमध्ये शिफ्ट झालेली प्रीती ऑस्करपूर्वीच्या पार्टीत दिसली होती. तिने मलाला युसुफझाई, जॅकलिन फर्नांडिस आणि इतरांसोबत ज्युनियर एनटीआरचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले होते. सध्या ती आयपीएल टीम पंजाब किंग्जच्या खेळाडूंसोबत खूप दिसत आहे. ती या संघाची सह-मालक आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात