जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / प्रियांका आणि करिनाने एकाच अभिनेत्याला केलंय डेट? दोघींच्या 'त्या' उत्तरानं करणंही पडला चाट

प्रियांका आणि करिनाने एकाच अभिनेत्याला केलंय डेट? दोघींच्या 'त्या' उत्तरानं करणंही पडला चाट

प्रियांका आणि करिना

प्रियांका आणि करिना

जेव्हा करीना कपूर आणि प्रियांका चोप्रा या शोच्या सीझन 6 मध्ये पाहुण्या म्हणून आल्या तेव्हा करण जोहरने त्यांच्या लव्ह लाइफशी संबंधित एक प्रश्न विचारला होता. या दोघीनी दिलेल्या त्या उत्तराची आजही चर्चा होते.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 09 एप्रिल : करण जोहर त्याच्या चित्रपटांव्यतिरिक्त त्याच्या ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमुळे चर्चेत राहतो, कारण त्याच्या चॅट शोमध्ये फिल्मी दुनियेतील बडे स्टार्स त्यांच्या आयुष्यातील छोटे-मोठे खुलासे करण्यास मागेपुढे पाहत नाहीत. चॅट शोमध्ये, स्टार्स त्यांच्या स्पष्ट बोलण्याच्या शैलीमुळे अनेकदा वादात सापडले आहेत. अनेकवेळा स्टार्स शो दरम्यान काहीतरी बोलतात, जो चर्चेचा विषय बनतो.  तथापि, जेव्हा करीना कपूर आणि प्रियांका चोप्रा या शोच्या सीझन 6 मध्ये पाहुण्या म्हणून आल्या तेव्हा करण जोहरने त्यांच्या लव्ह लाइफशी  संबंधित एक प्रश्न विचारला होता. या दोघीनी दिलेल्या त्या उत्तराची आजही चर्चा होते. खरं तर, करिना आणि प्रियंका अभिनेता शाहिद कपूरला डेट करत होत्या. पण दोघींच्याही या नात्याचा शेवट चांगला झाला नाही. दोघींचंही शाहिद कपूर सोबत ब्रेकअप झालं. या दोघी करण जोहरच्या कॉफी विथ करण’ मध्ये आल्या होत्या. तेव्हा करणने विचारलेल्या एका प्रश्नाचं त्यांनी जे उत्तर दिलं त्याची आजही चर्चा होते. काय म्हणाल्या होत्या त्या दोघी जाणून घ्या. रेखाची बेस्ट फ्रेंड होती ‘ही’ अभिनेत्री; पण त्या घटनेमुळे दोघींमध्ये पडली कायमची फूट त्या विशिष्ट संभाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये करण जोहर त्या दोघांना म्हणताना दिसत आहे, ‘तुम्हा दोघांचा एकच माजी प्रियकर होता आणि ही गोष्ट तुमच्या दोघांमध्ये समान आहे.’ प्रियांका चोप्राने उपहासात्मक उत्तर दिले. दिया म्हणाली, ‘‘आमच्यात हे कॉमन आहे, पण ते वादाचे कारण बनले नाही.’’ प्रियांकाच्या शेजारी बसलेल्या करीनाने तिच्या मुद्द्याला पाठिंबा दर्शवला.

जाहिरात

करण जोहर या प्रश्नाच्या नादात म्हणतो की, करिना कपूर शाहिद कपूरसोबत ५ वर्षे रिलेशनशिपमध्ये होती, तर प्रियंकासोबत तिचे अफेअर २ वर्षे टिकले. ‘कॉफी विथ करण’ 6 च्या एका एपिसोडमध्ये शाहिद कपूरलाही करण जोहरच्या प्रश्नांचा सामना करावा लागला. चित्रपट निर्मात्याने त्यांना विचारले होते की, जर तुम्हाला एवढी ताकद मिळाली की तुम्ही तुमच्या माजी मैत्रिणींसोबतच्या आठवणी विसरू शकता, तर प्रियंका-करीनापैकी कोणती आठवण मिटवणार? या दोघांच्याही आठवणी पुसून टाकणे मला आवडणार नाही, असे शाहिद कपूरने सांगितले, कारण आज ते जे काही आहेत, त्या आठवणी आणि नातेसंबंधांचीही भूमिका आहे, असे त्याला वाटते. त्या अनुभवांनी त्याला आयुष्यात खूप काही शिकवलं होतं. शाहिदचे करीनासोबतचे नाते दीर्घ होते, तर प्रियांकासोबतचे नाते अल्प होते.

News18लोकमत
News18लोकमत

करीना आणि प्रियांकाच्या वर्क फ्रंट बद्दल बोलायचे झाले तर, 40 वर्षीय प्रियांका चोप्रा तिच्या ‘सिटाडेल’ या वेब सीरिजच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असताना, 42 वर्षीय करीना कपूर तिच्या पुढील प्रोजेक्ट ‘द क्रू’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. दुसरीकडे, करण जोहर त्याचा पुढील चित्रपट ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ च्या रिलीजची वाट पाहत आहे जो 28 जुलै रोजी प्रदर्शित आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात