मुंबई 26 जून: मराठी चित्रपटसृष्टीतील खतरनाक दिग्दर्शक म्हणून ओळख असलेले तडफदार व्यक्तिमत्त्व म्हणजे (Pravin Tarde) प्रवीण तरडे. प्रवीण तरडे यांचा दबदबा साऱ्या इंडस्ट्रीमध्ये आहे. ते कायमच त्यांच्या रावडी आणि खतरनाक अंदाजासाठी ओळखले जातात. या दिग्दर्शकाने आज सोशल मीडियावर (Pravin Tarde Instagram) एक खूप गोड आणि स्पेशल पोस्ट केली आहे.
प्रवीण यांच्या वडिलांचा आज वाढदिवस आहे. प्रवीण कायमच वडिलांबद्दल आदरपूर्वक आणि प्रेमळ भावना व्यक्त करताना दिसून आले आहेत. प्रवीण कायमच सगळीकडे त्यांचं पूर्ण नाव लिहिताना दिसतात. त्यातून सुद्धा त्यांच्या वडिलांबद्दल असलेलं त्यांचं प्रेम आणि आदर कळतो.
प्रवीण यांनी (Pravin Tarde father) वडलांच्या 79 व्या वाढदिवसानिमित्त एक खास पोस्ट शेअर करत त्यांना शुभेच्या दिल्या आहेत आणि त्यांच्या निरोगी व सुदृढ आयुष्याची मनोकामना केली आहे. यात ते असं लिहितात, ‘आज माझ्या वडिलांचा विठ्ठलरावांचा ७९ वा वाढदिवस .. पुढच्या वर्षी सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा .. पांडुरंगाच्या चरणी एकच ईच्छा शंभरी पर्यन्त त्यांना असच आरोग्य लाभू दे 🙏🙏 खुप शुभेच्छा’
त्यांचे वडील या व्हिडिओमध्ये अगदी मनमोकळेपणाने आणि आनंदाने शेतात काम काम करताना दिसत आहे. कामासोबतच विठुरायाशी भक्तीरूपी गाण्यातून संवाद साधताना सुद्धा ते दिसत आहेत. ‘विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला’ असा जागर करत ते अगदी साध्या वेशात आपली भक्ती व्यक्त करत आहेत. प्रवीण यांनी त्यांचा वडिलांचा पुढच्या वर्षी सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा साजरा करायचा बेत आखला आहे. या व्हिडिओवर हजरो चाहत्यांनी कमेंट करून बाबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत आणि त्यांना उदंड आयुष्य लाभू दे अशी आशा व्यक्त केली आहे.
प्रवीण तरडे सध्या धर्मवीर चित्रपटाचं यश अनुभवताना दिसत आहे. धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाचं दिग्दर्शन करत त्यांनी एक अप्रतिम कलाकृती प्रेक्षकांसमोर आणली आहे. सध्याच्या राजकीय परिस्थिती त्यांच्या या चित्रपटाची चर्चा होताना दिसत आहे.
हे ही वाचा- Raanbaazaar webseries: 'रानबाजार'मधल्या भूमिकेसाठी प्राजक्ता फिरली बुधवार पेठेत तर तेजस्विनीने केलं काय!
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Birthday celebration, Director, Father, Marathi entertainment