मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Raanbaazaar webseries: 'रानबाजार'मधल्या भूमिकेसाठी प्राजक्ता फिरली बुधवार पेठेत तर तेजस्विनीने केलं काय!

Raanbaazaar webseries: 'रानबाजार'मधल्या भूमिकेसाठी प्राजक्ता फिरली बुधवार पेठेत तर तेजस्विनीने केलं काय!

(Ranbazar webseries) रानबाजार वेबसिरीजचे सगळे एपिसोड आता रिलीज झाले आहेत. तेजस्विनी आणि प्राजक्ता यांच्या भूमिकेचं प्रचंड कौतुक होताना दिसत आहे. आधी भयानक ट्रोलिंग सहन केलेल्या या अभिनेत्रींनी नक्की भूमिका करताना काय अभ्यास केला अशा बऱ्याच unseen गोष्टी जाणून घ्या.

(Ranbazar webseries) रानबाजार वेबसिरीजचे सगळे एपिसोड आता रिलीज झाले आहेत. तेजस्विनी आणि प्राजक्ता यांच्या भूमिकेचं प्रचंड कौतुक होताना दिसत आहे. आधी भयानक ट्रोलिंग सहन केलेल्या या अभिनेत्रींनी नक्की भूमिका करताना काय अभ्यास केला अशा बऱ्याच unseen गोष्टी जाणून घ्या.

(Ranbazar webseries) रानबाजार वेबसिरीजचे सगळे एपिसोड आता रिलीज झाले आहेत. तेजस्विनी आणि प्राजक्ता यांच्या भूमिकेचं प्रचंड कौतुक होताना दिसत आहे. आधी भयानक ट्रोलिंग सहन केलेल्या या अभिनेत्रींनी नक्की भूमिका करताना काय अभ्यास केला अशा बऱ्याच unseen गोष्टी जाणून घ्या.

पुढे वाचा ...

मुंबई 26 जून: सध्या सगळीकडे ज्या वेबसिरीजची जबरदस्त चर्चा आहे ती म्हणजे प्लॅनेट मराठी ott वरील (Ranbazar) ‘रानबाजार’. तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) आणि प्राजक्ता माळी यांची मुख्य भूमिका असलेली ही वेबसिरीज (Raanbaazar webseries)  अगदी पहिल्या टीझरपासूनच प्रचंड चर्चेत आली होती. कारण होतं या सिरीजचा बोल्ड विषय आणि मांडणी. यावरून कलाकारांना शिव्याशाप ऐकावे लागले, ट्रोलिंग सहन करावं लागलं पण या वेबसीरिजचे सगळे एपिसोड रिलीज झाल्यावर प्रेक्षकांचं मत बदललेलं दिसत आहे. यासाठी या दोन अभिनेत्रींनी नक्की काय काय तयारी केली तुम्हाला इतंभूत सांगणार आहोत.

याआधी सुद्धा प्राजक्ता (Prajakta Mali) तिची या सीरिजमधील भूमिकेसाठी झालेली निवड आणि त्यासाठी तिने घेतलेले कष्ट याबद्दल बरीच सक्रिय होऊन सोशल मीडियावर बोलताना दिसली. नुसत्या टीझरमुळेच सगळीकडे एवढी बोंबाबोंब झाली की प्राजक्ताच्या आणि तेजस्विनीच्या पोस्टवर अनेकांनी अगदी अश्लाघ्य भाषेत ट्रोलिंग करायला सुरवात केली होती. मात्र याचा परिणाम होऊ न देता दोन्ही अभिनेत्री तटस्थ राहून आपलं काम करत होत्या.

प्राजक्ताने याआधी सुद्धा एका इस्नातग्राम पोस्टच्या माध्यमातून स्पस्ट केलं होतं की या भूमिकेसाठी तिने तब्ब्ल नऊ-दहा किलो वजन वाढवलं. रत्ना ज्या पद्धतीने चालेल, बोलेल यासाठी तिने बराच अभ्यास केला, पानसुपारी खायचा अभिनय करून हुबेहूब व्यसन करत आहे असा आभास सुद्धा तयार केला. तसंच प्राजक्ता red light area मध्ये एकटी फिरून सुद्धा आली होती असा खुलासा तिनं केला आहे.

पुढारी ऑनलाईनला दिलेल्या एका मुलाखतीत ती सांगते, “माझ्यासाठी रत्न ही भूमिका करणं अवघड होतं. तिच्यासारखा अंदाज आणण्यासाठी मी वजन वाढवलं अगदी भूमिकेपुरती सिगरेट सुद्धा ओढायला शिकले. मी व्यसनांच्या विरोधात असतानाही भूमिकेसाठी मी सिगरेट ओढली. तसंच वेश्यांचं आयुष्य जवळून कळावं यासाठी मी एकटी पुण्याच्या बुधवार पेठेत जाऊन आले, तिथल्या महिलांशी बोलले, गप्पा मारल्या आणि त्यातून त्यांचं आयुष्य समजून घ्यायचा प्रयत्न केला.

" isDesktop="true" id="723175" >

तसंच आमच्या टीम समवेत कामाठीपुराला सुद्धा भेट दिली. तिथे जाऊन रीतसर त्यांचं राहायचं ठिकाण, काम करायचं ठिकाण त्यांच्या सवयी या सगळ्या जवळून अनुभवल्या. या भूमिकेसाठी सेक्स वर्करची वैचारिकता जाणून घ्यायची होती. त्याचा अभ्यास मला या भेटीतून करता आला.”

तर तेजस्विनीने या भूमिकेत बरेचसे सीन्स हे without makeup दिले आहेत.

तेजस्विनीने तिच्या नव्या इंस्टाग्राम पोस्टवरून त्यांनी ही माहिती दिली. काही मोजके सीन सोडता अख्ख्या वेबसिरीजमध्ये तेजस्विनीच्या चेहऱ्यावर अजिबात मेकअप नव्हता.

हे ही वाचा- Kushal Badrike: बापरे! कुशल बद्रिकेने dummy न वापरता केले खतरनाक स्टंट, पाहा video

 तिने संपूर्ण वेबसिरीज मेकअप शिवाय केवळ नैसर्गिक हावभावांवर आणि कमाल expressions वर अप्रतिम पद्धतीने पेलली आहे.

या वेबसिरीजमुळे कलाकारांच्या ट्रोलिंगचा मुद्दा पुन्हा समोर आला आहे. मराठी वेबविश्वात या सिरीजमुळे एक नवा बदल घडताना दिसत आहे अशी प्रतिक्रिया समोर येत आहे.

First published:
top videos

    Tags: Marathi actress, Marathi entertainment, Tejaswini pandit, Web series