Home /News /entertainment /

स्मिता पाटील यांचा मुलगा प्रतिक बब्बर वर्षभरातच घेणार घटस्फोट?

स्मिता पाटील यांचा मुलगा प्रतिक बब्बर वर्षभरातच घेणार घटस्फोट?

प्रतिक बब्बर आणि सान्या सागर यांनी मागच्या वर्षी मोठ्या थाटामाटात लग्न केलं होतं. बॉलिवूडच्या बहुचर्चित लग्नांपैकी हे एक लग्न होतं.

    मुंबई, 31 मार्च :  बॉलिवूडमध्ये नवी नाती जुळणं आणि जुनी नाती तुटणं हे काही नवीन नाही. मागच्या काही महिन्यांमध्ये अनेक बॉलिवूड कपल्समध्ये अनपेक्षित घटस्फोट झालेले पाहायला मिळाले. त्यानंतर आता यात आणखी एका कपलची भर पडली आहे. बॉलिवूडच्या दिवंगत प्रसिद्ध अभिनेत्री स्मिता पाटील यांचा मुलगा प्रतिक बब्बर पत्नी सान्या सागर हिच्यापासून घटस्फोट घेणार असल्याचं बोललं जात आहे. प्रतिक बब्बर आणि सान्या सागर यांनी मागच्या वर्षी मोठ्या थाटामाटात लग्न केलं होतं. बॉलिवूडच्या बहुचर्चित लग्नांपैकी हे एक लग्न होतं. पण आता एका वर्षातच या दोघांमध्ये सर्वकाही अलबेल नसल्याचं बोललं जात आहे. स्पॉटबॉय-ईनं दिलेल्या वृत्तानुसार प्रतीक आणि सान्या यांच्या मागच्या काही दिवसांपासून वाद सुरू आहेत. सूत्राच्या माहितीनुसार सध्या सुरू असलेल्या लॉकडाउनमध्ये सर्वच सेलिब्रेटी आपल्या कुटुंबीयांसोबत वेळ घालवताना दिसत आहेत. तर दुसरीकडे प्रतिक आणि सान्या यांचं नातं मात्र तुटण्याच्या मार्गावर आहे. मागच्या काही दिवसांपीसून वेगवेगळे राहत आहेत. अमृता-RJ अनमोलचा खास लॉकडाऊन VIDEO, लाईव्हदरम्यान केलं चाहत्याच्या मुलीचं बारसं स्पॉटबॉय-ईनं दिलेल्या वृत्तानुसार प्रतिकला या बाबात फोनवरुन काही प्रश्न विचारण्यात आल्यावर त्यानं मात्र असं काहीही नाही आहे असं म्हणून हा प्रश्न टाळला. मात्र या वृत्तानुसार सान्यानं बब्बर फॅमिलीच्या अनेक महत्त्वाच्या सेलिब्रेशनमध्ये सहभाग घेतलेला नाही. मग ते होळी सेलिब्रेशन असो वा मग राज बब्बर यांचं अ‍ॅनिव्हर्सरी डिनर कोणत्याही वेळी सान्या बब्बर फॅमिलीसोबत दिसली नाही. याशिवाय सान्यानं तिच्या नाटकाच्या प्रयोगालाही पती प्रतिकला बोलवलं नव्हतं. लढा कोरोनाशी! अभिनेत्री सई ताम्हणकरने दिला मदतीचा हात दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील आणि राज बब्बर यांचा मुलगा प्रतिक बब्बर यानं 23 जानेवारी 2019ला त्यांची लॉन्गटर्म गर्लफ्रेंड सान्या सागरशी लग्न केलं होतं. सान्या बीएसपी लीडर पवन सागर यांची मुलगी आहे. लग्नाच्या काही दिवसांनंतर या दोघांचे काही फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते. पण आता प्रतिकनं त्यांच्या हानीमूनचे फोटोही इन्स्टाग्रामवरून डिलिट केले आहेत. 'शक्तिमान'ची होणार पुन्हा एकदा एंट्री, सोशल मीडियावर MEMES चा पाऊस
    Published by:Megha Jethe
    First published:

    Tags: Bollywood

    पुढील बातम्या