मुंबई, 30 मार्च : कोरोनामुळे (Coronavirus) जगभरात क्वारंटाइनचे नियम पाळले जात आहेत. भारतातही 21 दिवसांचा लॉकडाऊन आहे. अनेक सेलिब्रिटी कपल्स त्यांच्या ‘Quarantine Days’चे व्हिडीओ शेअर करत आहेत तर काही जण लाईव्ह करून प्रेक्षकांशी गप्पा मारत आहेत. अभिनेत्री अमृता राव (Amrita Rao) आणि आरजे अनमोल (RJ Anmol) या दोघांनी सुद्धा लाईव्ह करून प्रेक्षकांशी गप्पा मारल्या मात्र यावेळी गमतीची बाब म्हणजे अमृताने लाईव्हदरम्यान तिच्या एका फॅनच्या मुलीचं नामकरण केलं आहे. स्वत: अमृताने लाईव्हनंतर हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. (हे वाचा- लढा कोरोनाशी! अभिनेत्री सई ताम्हणकरने दिला मदतीचा हात ) लाईव्हदरम्यान अमृता आणि अनमोलचा जयपूरमधील फॅन त्यांच्याबरोबर जोडला गेला होता. त्याने सांगितले की 10 दिवसांपूर्वी त्याच्या मुलीचा जन्म झाला. पण लॉकडाऊनमुळे मुलीच्या बारशाला कुणी येऊ शकत नाही. टायगर बारोट असं या तरूणाचं नाव होतं. मग त्याने अमृताला नाव ठेवण्याची विनंती केली. त्याने विनंती केल्यानुसार अमृताने D या अक्षरावरून तिचं नाव ‘देविका’ असं ठेवलं. त्याच्या Cute मुलीला पाहून अमृतालाही खूप आनंद झाला. मात्र एखाद्याच्या मुलीचं नाव ठेवताना अंगावर शहारे येत होते, अशी प्रतिक्रिया अमृताने दिली. या प्रसंगामुळे अमृता आणि अनमोल दोघेही भारावले होते. अमृताने हे देखील सांगितलं की ‘देविका’ हे तिचं आवडीचं नाव आहे.
अमृताची फॅन फॉलोइंग आणि आरजे अनमोलची फॅन फॉलोइंग वेगळी आहे. या दोघांनीही कधीही कोणता लाईव्ह व्हिडीओ केला नव्हता. पण त्यांचा पहिलाच व्हिडीओ त्यांच्यासाठी आणि त्यांच्या फॅन्ससाठी खास ठरला आहे.