Home /News /entertainment /

'शक्तिमान'ची होणार पुन्हा एकदा एंट्री, सोशल मीडियावर MEMES चा पाऊस

'शक्तिमान'ची होणार पुन्हा एकदा एंट्री, सोशल मीडियावर MEMES चा पाऊस

रामायण, महाभारत, ब्योमकेश बक्शी आणि सर्कस या कार्यक्रमानंतर नागरिकांसाठी आणखी एक खूशखबर आहे. दूरदर्शनवरील सुपर हिरो शक्तिमान (Shaktiman) सुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे.

    मुंबई, 30 मार्च : कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) देशभरात 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याचप्रमाणे विविध राज्यांचे मुख्यमंत्री लॉकडाऊनचे पालन काटेरोरपणे करण्याचे आवाहन करत आहेत. कोरोनापासून वाचवण्यासाठी तोच एकमेव पर्याय आहे. पंतप्रधान असं म्हणाले होते की, जर लॉकडाऊनचं पालन केले नाही, तर कोणत्या संकटाला सामोरे जावे लागेल, याचा अंदाज नाही लावू शकत. अशा परिस्थितीत काहीजण वर्क फ्रॉम होम करत आहेत तर अनेकांना कामाशिवाय घरी बसावे लागले आहे. अशावेळी लोकांनी मागणी केल्यामुळे 80 आणि 90 च्या दशकातील दूरदर्शन (Doordarshan) प्रसिद्ध मालिका पुन्हा एकदा सुरू करण्यात आल्या आहेत. (हे वाचा-लॉकडाऊनमुळे फार्म हाऊसवरच सलमानने साजरा केला भाचा अहिलचा वाढदिवस) त्या काळात गाजलेल्या रामायण, महाभारत, ब्योमकेश बक्शी आणि सर्कस या कार्यक्रमानंतर नागरिकांसाठी आणखी एक खूशखबर आहे. दूरदर्शनवरील सुपर हिरो शक्तिमान (Shaktimaan) सुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे. शक्तिमानची भूमिका करणारे (Mukesh Khanna) यांनी यासंदर्भात एक हिंट दिली आहे. शक्तिमानची प्रसिद्ध भूमिका करणारे आणि त्या काळात अनेकांना ‘Sorry शक्तिमान’ म्हणायला लावणारे मुकेश खन्ना यांनी नुकतीच माहिती दिली आहे की, शक्तिमानसाठी लोकांची मागणी वाढत आहे. त्यामुळे शक्तिमानचा सिक्वेल येणार आहे. या सिक्वेलवर गेल्या 3 वर्षांपासून काम सुरू आहे. हा प्रोजेक्ट हाती घेण्यात आला आहे, कारण प्रेक्षकांना उत्सुकता आहे की पुढे शक्तिमानमध्ये काय घडलं, अशी माहिती खन्ना यांनी दिली आहे. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. (हे वाचा-आज जो काही आहे तो भारतीयांमुळेच... अभिनेत्यानं केली 1 कोटींची मदत) त्यांनी सांगितलं की लॉकडाऊनमुळे शक्तिमानच्या सिक्वेलचं काम थांबलं आहे. मी वाट पाहत आहे की लवकरच हे संपेल आणि मी पुन्हा काम सुरू करेन कारण प्रेक्षकांची मागणी वाढत आहे. मुकेश खन्ना यांची शक्तिमानवर आधारित फिचर फिल्म बनवण्याची सुद्धा इच्छा आहे. शक्तिमानची एक अ‍ॅनिमेटेड सिरीज 2011 मध्ये प्रसारित करण्यात आली होती. त्यानंतर 2013 मध्ये एक टेलीफिल्म ‘हमारा हिरो शक्तिमान’ सुद्धा प्रसारित करण्यात आली होती. ज्यामध्ये मुकेश खन्ना यांनी शक्तिमान आणि उदय सचदेवा यांनी ज्युनिअर शक्तिमानची भूमिका निभावली होती. पोगो चॅनेलवर याचं प्रसारण झाले होते. दरम्यान शक्तिमान मालिकेबद्दलचे मीम्स आधीच सोशल मीडियावर खूप व्हायरल आहेत. 'मीमकरां'साठी शक्तिमान हे प्रसिद्ध पात्र आहे. अशावेळी जर शक्तिमानचा सिक्वेल येणार असेल, हे समजल्यावस सोशल मीडियावर मीम्सचा अक्षरश: पाऊस पडतो आहे. मुकेश खन्ना यांचा व्हिडीओ शेअर करत अनेकांनी आनंद व्यक्त केला आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Shaktiman

    पुढील बातम्या