मुंबई, 16 मार्च: अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद ओक दिग्दर्शित ‘चंद्रमुखी’ (Prasad Oak Chandramukhi) हा सिनेमा रीलिज झालेल्या पहिल्या पोस्टरपासून चाहत्यांची उत्कंठा वाढवत आहे. काही वेळापूर्वी रीलिज झालेल्या नवीन टीजरमध्ये (Chandramukhi Teaser Out) एक मोठा खुलासा झाला आहे की यामध्ये मुख्य भूमिकेत कोण अभिनेता असणार आहे. काही दिवसांपूर्वी अजय-अतूल यांच्या अफलातून संगीताची (Ajay-Atul Musical Chandramukhi) झलक दाखवणारा या सिनेमाचा टीजर प्रदर्शित झाला होता. त्यामधील प्रसाद ओकच्या खणखणीत आवाजात, ‘तो ध्येय धुरंधर राजकारणी.. ती तमाशातली शुक्राची चांदणी.. लाल दिवा आणि घुंगरांच्या गुंतावळीची.. राजकीय रशिली प्रेमकहाणी’, हे वाक्य ऐकल्यानंतर ‘चंद्रमुखी’मध्ये चंद्रा कोण आणि कोण आहे तो ध्येय धुरंधर राजकारणी? असे अनेक सवाल सिनेरसिकांच्या मनात उपस्थित झाले होते. त्यातील एका प्रश्नाचं उत्तर आज उगलडलं आहे.
‘चंद्रमुखी’ हा सिनेमा एक राजकारणात मुरलेला नेता खा. दौलत देशमाने आणि एक लावणी कलावंत असणाऱ्या ‘चंद्रा’ची प्रेमकहाणी आहे. दिग्दर्शक प्रसाद ओकने आज (16 मार्च 2022) रोजी शेअर केलेल्या नवा टीजरमध्ये खा. दौलत देशमाने अर्थात त्या ध्येय धुरंधर नेत्याचा लुक रीव्हिल केला आहे. हा अभिनेता दुसरा तिसरा कुणी नसून मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आदिनाथ कोठारे (Adinath Kothare in Chandramukhi as Daulat Deshmane) आहे. आदिनाथ कोठारे खा. दौलत देशमाने ही भूमिका साकारणार आहे. हे वाचा- BBM विजेता विशाल निकम झळकणार मालिकेत, साकारणार ही भूमिका खा. दौलत देशमानेची झलक शेअर करताना प्रसाद ओकने असं कॅप्शन दिलं आहे की, ‘भारदस्त आवाज, करारी नजर, नेता ध्येयधुरंधर… पण मनात उफाळलेला अखंड कलेचा सागर… ‘खा. दौलत देशमानें’च्या दमदार भूमिकेत आदिनाथ कोठारे’. पाहा ‘खा. दौलत देशमाने’ची पहिली झलक-
प्रसाद ओकने मंगळवारी शेअर केलेल्या एका पोस्टमध्ये असं म्हटलं होतं की, खा. दौलत देशमाने देशाचे भावी उद्योगमंत्री राजकारणातला नवा तारा आहेत. हा टीजर पाहून चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे. ‘चंद्रा’च्या ‘दौलत’चा चेहरा दिसला पण नेमकी चंद्रा कोण आहे, हे मात्र गुलदस्त्यात आहे. या टीजरच्या शेवटी आदिनाथ कोठारे अर्थात दौलतचा एक डायलॉग आहे की, ‘कोण आहेस तू चंद्रा?’. हाच हॅशटॅग या सिनेमाच्या प्रत्येक पोस्टसाठी वापरण्यात आला आहे-#KonAahesTuChandra #कोणआहेसतूचंद्रा. हे वाचा- अमृता रावने 9 वर्षानंतर शेअर केला लग्नाचा फोटो,असा होता अभिनेत्रीचा वेडिंग LOOK कमेंट्समध्ये सिनेरसिक ही अभिनेत्री कोण आहे याचा अंदाज बांधत आहेत. चाहत्यांच्या मते ही अभिनेत्री अमृता खानविलकर असण्याची शक्यता आहे. दरम्यान 14 मार्च रोजी प्रसाद ओकने याच सिनेमा संदर्भात एक व्हिडीओ शेअर केला होता. ज्यात एक रेडिओवरील भाषण ऐकू येत आहे. रेडिओवर भाषण करणारा नेता लोक कलावंतांना न्याय मिळवून देण्याबाबत बोलत आहे. हा व्हिडीओ अमृता खानविलकर हिनेही शेअर केला आहे. त्यामुळे चाहत्यांना अमृताच चंद्रा असल्याचे ठाम वाटत आहे. पण आता नेमकी चंद्रा कोण हे पाहण्यासाठी सिनेमाची नवी झलक येण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे.
ज्याप्रमाणे चंद्रमुखीची पहिली झलक सोशल मीडियावर व्हायरल झाली होती, त्याप्रमाणे या नव्या टीजरही चाहत्यांना आवडत आहे. त्यावरही चाहत्यांच्या कमेंट्स यायला सुरुवात झाली आहे.