'बिग बॉस मराठी'चा तिसरा पर्व प्रचंड गाजला होता. या शोमध्ये सहभागी झालेल्या कलाकरांना तुफान लोकप्रियता मिळाली आहे.
या शोमध्ये विशाल निकमला सुरुवातीपासून प्रेक्षकांचं प्रचंड प्रेम मिळालं होतं. त्यामुळेच विशाल या पर्वाचा विजेता ठरला होता.
गेल्या अनेक दिवसांपासून चाहते त्याला एखाद्या मालिकेमध्ये पाहण्यासाठी उत्सुक होते. चाहत्यांची ही इच्छा लवकरच पूर्ण होणार असल्याचं दिसतंय.
विशाल निकम कलर्स मराठीवरील 'आई मायेचं कवच' या मालिकेत मानसिंगच्या भूमिकेत दिसणार असल्याचं समोर आहे.