सध्या मनोरंजनसृष्टीत अनेक लग्न पार पडत आहेत. अनेक लव्ह बर्ड्स लग्नाच्याबंधनात अडकत आहेत. अशातच बॉलिवूडमधील काही सिक्रेट मॅरेजसचे फोटो आता पाहायला मिळत आहेत.
इश्क-विश्क, विवाह यांसारख्या चित्रपटांमधून तरुणांना वेड लावणारी अभिनेत्री म्हणजे अमृता राव होय. आज ही अभिनेत्री एका मुलाची आई आहे.
मात्र फारच कमी लोकांनां अमृताच्या लग्नाबद्दल माहिती आहे. अभिनेत्रीने तब्बल ९ वर्षांपूर्वी गुपचूप लग्न केलं होतं. त्यांनतर आज अभिनेत्रीने आपल्या लग्नाचा फोटो शेअर करत सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
अभिनेत्री अमृता रावने 2016 मध्ये आपल्या लग्नाचा खुलासा केला असला, तरी तिने 2014 मध्ये लग्न केलं होतं.
आपल्या लग्नाचा आपल्या करिअरवर कोणताही परिणाम होऊ नये यासाठी आपण ते गुपचूप ठेवल्याचं अभिनेत्रीने उघड केलं आहे.
त्यांच्या गुपचूप लग्नाबद्दल सांगताना अनमोल म्हणाला की, 'अमृताला 3 मोठ्या बॅनरच्या चित्रपटांची ऑफर आली होती आणि तिची कारकीर्द संवेदनशील वळणावर होती.
त्यावेळी मी अमृताला लग्नासाठी विचारले तर तिने नकार दिला.यानंतर अनमोलच्या डोक्यात गुपचूप लग्नाची कल्पना आली. आणि त्यांनी 25 मे 2014 मध्ये लग्न केलं होतं.