बॉलिवूड अभिनेत्री विद्या सिन्हा यांचं हृदयविकारानं निधन

बॉलिवूड अभिनेत्री विद्या सिन्हा यांचं हृदयविकारानं निधन

मागच्या काही काळापासून हृदयविकार आणि फुफ्फुसांच्या आजारानं त्रस्त होत्या.

  • Share this:

मुंबई, 15 ऑगस्ट : जेष्ठ अभिनेत्री विद्या सिन्हा यांचं नुकतंच मुंबईतील क्रिटीकेअर हॉस्पिटलमध्ये निधन झलं. त्या मागच्या काही काळापासून हृदयविकार आणि फुफ्फुसांच्या आजारानं त्रस्त होत्या. बॉलिवूडमधील अनेक सिनेमांमध्ये काम केल्यानंतरही त्या प्रेक्षाकांच्या लक्षात राहिल्या त्या त्यांच्या रजनीगंधा या सिनेमातील भूमिकेमुळे. बॉलिवूडच्या ‘छोटी सी बात’, ‘रजनीगंधा’, ‘पती पत्नी और वो’ यासारख्या सिनेमात त्यांनी काम केलं होतं. काही दिवसांपूर्वीच त्यांचा आजार बळवल्यानं त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं होतं. तेव्हा पासून त्या व्हेंटिलेटरवर होत्या. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. त्या 72 वर्षांच्या होत्या.

विद्या यांनी सिनेमांव्यतिरिक्त ‘काव्यांजली’, ‘कबूल है’, ‘चंद्र नंदिनी’, ‘कुल्फी कुमार बाजेवाला’ यांसारख्या हिंदी मालिकांमध्येही भूमिका साकारल्या होत्या. बऱ्याच वर्षांनी अभिनेता सलमान खानच्या ‘बॉडीगार्ड’ चित्रपटामध्ये त्यांची झलक पाहायला मिळाली होती.

================================================

SPECIAL REPORT : मिकाला तो परफॉर्मन्स पडला भारी, गाण्यावर भारतात आली बंदी

Published by: Manoj Khandekar
First published: August 15, 2019, 2:26 PM IST
Tags: Bollywood

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading