मुंबई, 29 ऑक्टोबर : प्रार्थना बेहरे ही अभिनेत्री सध्या बरीच प्रसिद्ध होताना दिसत आहे. प्रार्थना सध्या छोट्या पडद्यावर एका चांगल्या भूमिकेत दिसत असल्याने तिचं फॅन फॉलोईंग कमालीचं वाढलेलं दिसत आहे. प्रार्थनाने आज खाजगी आयुष्याबद्दल तीच मत एक पोस्ट शेअर करत व्यक्त केलं आहे. तिने नुकतीच एक खास पोस्ट शेअर केल्याचं पाहायला मिळत आहे. एकदम क्रेझी अंदाजात शेअर केलेली ही पोस्ट सध्या लक्ष वेधून घेताना दिसत आहे. आपल्याकडे लग्न होऊन काही काळ लोटला कि सगळ्यांना मुलं कधी होणार असा प्रश्न विचारला जातो. यातून मग अभिनेत्रींची देखील सुटका होत नाही. चाहते सर्रासपणे आपल्या आवडत्या लग्न झालेल्या अभिनेत्रीला ’ तू आई कधी होणार’ असा प्रश्न विचारतात. आता प्रार्थनाने याविषयी तिचं मत एकदम भन्नाट अंदाजात व्यक्त केलं आहे. तिने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. हेही वाचा - Aai kuthe kay karte: अनिरुद्धच ठरणार खरा; संजनाने गौरीला दिलेल्या सल्ल्याने मालिकेत घडणार मोठी घडामोड खरंतर हि पोस्ट म्हणजे रस्त्यावर लिहिण्यात आलेली पाटी आहे. पण त्यावरचे शब्द प्रार्थनेला भावले आहेत. त्या पाटीवर लिहिलंय कि, ‘‘जेव्हा वयाच्या तिशीत तुम्हाला मुलं नसतात तेव्हा खरं तर तुमची स्थिती वयाच्या विशीत असल्यासारखीच असते, फक्त त्यावेळी तुमच्याकडे पैसे असतात”. असे त्यावर लिहिण्यात आले आहे. हा फोटो पोस्ट करत तिने ‘हे अगदी खरंय’ असं म्हटलं आहे.
अलीकडेच प्रार्थनाने बस बाई बस या कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यावेळी सुद्धा तिला ‘तू आई कधी होणार’ असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर तिने थोडं रागात सुबोध भावेकडे पाहिलं आणि त्यावर तिने चिडक्या स्वरात उत्तर दिले. तुम्ही सर्व चांगलेच प्रश्न विचारताय ना? मग चांगलाच प्रश्न विचारा ना? असे प्रार्थना त्यांना म्हणाली. त्यावर महिला वर्गाने हे चांगलं आहे, असे म्हटले. त्यापुढे ती म्हणाली, माझ्या सासूबाईही हा शो बघत आहेत. पण मी काही वाईट काम करते का? पण मग हे सर्व झाल्यावर मला काम करता येणार नाही. नको ना…, हा विषय नको. मला खूप बाळं आहेत. आमच्या पाच पाळीव श्वान आहेत, १२ घोडे आहेत आणि मासे आहेत, दोन उंदीर आहेत, अशी खूप मुलं आहेत. त्याबरोबर मायरा माझी मुलगीच आहे. असे तिने या प्रश्नाला टोलवाटोलवी करत उत्तर दिले.
दरम्यान अभिनेत्री प्रार्थना बेहरे हिने 2017 मध्ये दिग्दर्शक अभिषेक जावकरबरोबर लग्नगाठ बांधली. मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी म्हणून अभिनेत्री प्रार्थना बेहरे आणि अभिषेक जावकर यांना ओळखले जाते. प्रार्थना बेहरे आणि अभिषेक जावकर यांचा विवाह १४ नोव्हेंबर २०१७ रोजी झाला होता. अभिषेक जावकर हा लेखक, दिग्दर्शक, निर्माता आहे.